ताज्या बातम्यानांदेड

संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा गुरुनगरी नांदेड येथे परतली.. पंजाब-हरियाणा-दिल्ली-हिमाचलचा दौरा पूर्ण : नानक साई फाऊंडेशन च्या उपक्रमाचे नांदेड मध्ये उस्फुत स्वागत.. 

नांदेड : जयकुमार अडकिने

महाराष्ट्रातील भाविकांना अध्यात्म, पर्यटन, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा अनुभव दिलेली नानक साई फाऊंडेशनची 11 वी “घुमान यात्रा” पंजाब हरियाणा हिमाचल प्रदेश व दिल्ली येथील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन शुक्रवार,७ नोव्हेंबर रोजी नांदेड येथे परतली असून छत्रपती संभाजीनगर व हजुर साहिब (नांदेड) रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत करण्यात आले.

पानिपत युद्धात शहीद झालेल्या मराठा विराना वंदन करून राजधानी दिल्ली येथे दाखल झालेली घुमान सद्भावना यात्रा काल रात्री मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस ने छत्रपती संभाजीनगर मार्गे नांदेड येथे दाखल झाली. यात्रेत १८० जण सहभागी होते. नानक साई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा वरिष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जातो.

संत नामदेव महाराजांनी मराठीचा झेंडा थेट पंजाबपर्यंत नेऊन पंजाब आणि महाराष्ट्रात बंधुभाव निर्माण केला. त्यांच्या कार्याची आठवण कायम ठेवण्यासाठी नानक साई फाउंडेशन दरवर्षी “ना नफा, ना तोटा” तत्वावर घुमानयात्रेचे आयोजन करते. यात्रा पंजाब-हरियाणा-दिल्ली-हिमाचल प्रदेशचा दौरा पूर्ण करून नांदेड येथे परतली असून जळगाव,मनमाड,छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी रेल्वे स्टेशन वर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर यांच्या हस्ते नांदेड येथे भाविकांचे स्वागत करण्यात आले. या ऐतिहासिक अशा घुमान यात्रेत नांदेड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संभाजीराव धुळगंडे, वसमतचे माजी नगरअध्यक्षा सौ मनीषा विजय कडतन, वसमत मार्केट कमिटी चे माजी सभापती पंडितराव सारंग,परमेश्वर शिंदे,डॉ रमेश नारलवार, एकनाथ मामडे,विजय कडतन,पंढरीनाथ बोकारे,सौ. प्रफुल्ला बोकारे,अरविंद शिंदे ,प्राजक्ता शिंदे,डॉ गजानन देवकर,अश्विनी देवकर,सरदार महेंद्रसिंग पैदल,अलंकार देवकर, प्रा राजेश मुखेडकर,गंगाधर पांचाळ,संजय कदम, ॲड राजा वीर,ज्योती आर वीर,ॲड देवकाते जी.बी.,शकुंतला जी देवकाते,ॲड व्ही जी बचाटे, रामराव मिजगर,मिनाक्षी मिजगर,मारोती कदम,रामचंद्र उन्हाळे,भास्कर दीक्षित,नवनाथ देशमुख,बालाजी ढगे,सखाराम गजले,रमेश सज्जन, आशा शेंडगे,गोविंदराव हंबर्डे, चरणसिंग पवार, अनिल जाधव,पुंडलिकराव बेलकर, सविता हंबर्डे,,लक्ष्मण जक्कवाड,गोदावरी जक्कवाड, नामदेव कोरडे,बाबजी काकडे,शोभाबाई काकडे ,ललिताबाई येसके ,लक्ष्मणराव येसके,कौश्यल्य दुधाटे,धनंजय उमरीकर ,मोहन फडसे ,विजया फडसे,जिजाबाई सारंग,मंजुषा सारंग,प्रभावती देशमुख,बाबुराव रोडगे ,भिवरा रॉडज,श्यामराव कोरडे,त्रिवेणी कोरडे,माणिकराव रोडगे ,चतुरा रोडगे,विठ्ठल रोडगे,संजीवनी रोडगे,संभाजी मस्के ,वंदना मस्के ,महेश हरकरे,माधुरी हरकरे,

परमेश्वर रेणकुंटवार,मंगल रेणकुंटवार,ईश्वरराव शेटे,भाग्यश्री शेटे,अनिल जाधव,गोकर्ण जाधव,सुरेश भाले,पद्मिनी भाले,अशोक कंकरे,लता कंकरे,,जयमाला मामडे,सुनीता पाटील,मंगलाबाई गोरे, डॉ श्रद्धा गोरे,प्रा शिवाजी गोरे,पुष्पा जाधव ,सुनंदा देशपांडे ,अरुणा शिंदे ,रेखा चंदेल,किशनराव भवर ,लतिका भवर,सोपानराव काळे,सुमन काळे,सुभाष भवर ,सविता भवर ,मलिकार्जुन मठपती,सरस्वती मठपती,अरुण कदम ,प्रतिभा कदम,अशोक साखरे,सुरेखा साखरे,सुधाकर ब्रम्हनाथकर,सुनीता ब्रम्हनाथकर,रेखा देशपांडे ,मुरलीधर जोशी,कृष्णा जोशी,अरुणा जोशी,दिलीप वेदपाठक,दिपाली वेदपाठक,सुनील खोचे,सीमा खोचे,सुनील वैद्य ,छाया वैद्य ,मंदाताई व्यवहारे ,लता वानखेडे,,जानराव मेश्राम ,शोभा मेश्राम ,विमल पवार,अरुण वेळास्कर,अर्चना वेळास्कर,मनोहरराव पवार,रजनी पवार ,संपतराव कोकरे,पुष्पा कोकरे ,शंकरराव कुबडे,शंकरराव कल्याणकर,रमेश देवणे,गंगाधर वडनावार,गोविंदराव अट्टल,चंदादेवी अट्टल,पांडुरंग भोसले,भागीरती भोसले, डॉ मारोती भोसले,पल्लवी भोसले,अमित पाटील,स्वाती पाटील,गणेश साळवे,दत्तात्रय शिंपी,दत्तात्रय खैरनार,प्रवीण भांडारकर ,अरविंद शिंपी , सचिन शिनगारे,भुजंगराव मुनेश्वर,जगदीश अहिरे,तनुजा अहिरे ,मीरा सोनवणे ,सरला सोनवणे,सुनीता कंधारी,गजानन निमगावकर,बबनराव घोडगे ,राम शेळके ,प्रभाकर गाजरे,दत्ता बोकारे ,रमेश डिघोलकर शेगावकर, प्रा शिवाजी नरहरे,नामदेव गायकवाड,सुरेश रापते,अशोक रामगिरवार,आदेश माळवदे,प्रशांत केंद्रे,अनुराधा केंद्रे,उत्तमराव जामगे,वर्षा जामगे,अमृत चवरे,छायादेवी चवरे,बाबू सरोदे ,मसाजी गिनाजी ,गणपत कंधारे, बबन सरोदे यांच्या सह १८० जण सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!