
कुंटूर : अफरोज चैधरी
नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामपंचायत गाजत आहे एक कोटी ५४ लाखाचा घोटाळा काही दिवसातच झाला असे उघड ग्रामसभेमध्ये झाले तरीही ग्रामसेवकाचे कारनामे काही थांबत नाहीत त्यातच ग्राम पंचायत ग्रामसेवक व सरपंच यांनी एक लाख रुपये सार्वजनिक समशानभूमीवर खर्च केल्याचे दाखवले मात्र सद्यस्थितीत कुंटूरला सार्वजनिक समशानभूमीच नाही तर खर्च झाला कोठे असा प्रश्न गावातील नागरिकांना पडला आहे त्यातच ग्रामपंचायत मध्ये चार फॅन खरेदी करून त्याच दिवशी चार पर्यंत दुरुस्ती करण्याचा खर्चही दाखवण्यात आला त्यामुळे ग्रामसेवक व सरपंचाचा चाल ढकल पणाला नागरिक वैतागले असून लाखो रुपयांची उधळपट्टी करत असताना सदर ग्रामविकास अधिकाऱ्याची चौकशी मास्तर गुलदस्त्यात ठेवली जात आहे त्याला सपोर्ट तालुका गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी सदर ग्रामसेवकाला पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट गावकरी कुंटूर येथील नागरिक बोलत आहेत. 24 मार्च 2025 रोजी कुंटूर ग्रामपंचायतीने स्मशानभूमी सफाई करिता स्वनिधी मधून 50 हजार रुपये खर्च करण्यात आले व नाली सफाई झाडे झुडपे कटई म्हणून 50 हजार रुपये खर्च करण्यात आले. विशेषतः तत्कालीन ग्रामसेवक यांनी 2022 यांच्या कार्यकाळात स्मशानभूमी साठी मोजणी करण्यात आली होती. खर्च पण करण्यात आला त्यावर आताचे ग्रामसेवक यरसनवार यांनी पन्नास हजार रू.झाडे झुडपे पन्नास हजार साफसफाई खर्च मार्च 2025 या वर्षी दाखवण्यात आला. पैसे कुठे आणि कसे खर्च दाखवून खावे हे विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवक यरसनवार यांच्याकडून शिकावे.
कुंटूर गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमी कुठे आहे? हे अजून गावकऱ्यांना माहिती नाही. मग खर्च कसा झाला आणि कुठे केला हे गावकरी सदर खर्चाचा तपशील मागत आहेत. वरील खर्च केल्याचा तपशील शासनाच्या अधिकृत वेबसाईट इ ग्रामस्वराज ॲप उपलब्ध आहे. अशी माहिती अफरोज चैधरी यांनी दिल्ली.

