ताज्या बातम्यानांदेडनायगाव

नायगावचे तालुका कृषी अधिकारी दीपेश देवरे यांची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून सेवेतून बंडथर्फ करा: विक्रम पाटील .

जिल्हाधिकारी काय कारवाई करणार शेतकऱ्यांचे लक्ष.

नायगाव तालुक्यातील कृषी अधिकारी हे कार्यालयात आठ दिवसाला एक वेळेस येऊन निघून जातात पण या ठिकाणी नायगाव तालुक्यातील प्रत्येक गाव खेड्यातील शेतकरी शासनाच्या विविध योजनेसाठी कृषी कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत पण अधिकारी वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे कर्मचाऱ्यांची अरेरावेची भाषा वाढली आहे.

नायगाव तालुक्याचे प्रमुख असलेले तालुका कृषी अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्यावर वाचक नसल्याने अनेक कर्मचारी कामाच्या वेळेत आपली जागा सोडून बाहेरची खाजगी व स्वताचे काम करत आहेत त्यामुळे कार्यालयात आलेल्या शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हे शासकीय कार्यालय आहे का नाही ?

नायगावच्या तालुका कृषी कार्यालयात कृषी तालुका अधिकारी ना कर्मचारी कार्यालयात फक्त रिकाम्या खुर्च्या दिसत आहेत नायगाव तालुक्यातील कृषी विभागाच्या कामकाजाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून कार्यालयातील अनियमता दूर करून गैरहजर कृषी तालुका अधिकारी दीपेश देवरे व कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांना विक्रम पाटील बामणीकर छावा मराठा युवा महासंघ उपजिल्हाप्रमुख नांदेड यांनी एका लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाच्या अनेक विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचणे ऐवजी कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक करत आहेत शासनाच्या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी कार्यालय आहे की शेतकऱ्यांना हेलपाटे करण्यासाठी ?असा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत.

मागील वर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात शासनाने ६० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना तुषार सिंचन योजना जाहीर केली होती पण या मुजोर कृषी अधिकारी दीपेश देवरे हे गेंड्याची कातडी पांघरून बसलेल्या तालुका कृषी अधिकारी हे ऑफिसमध्ये उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा नायगाव तालुक्यात फायदा होताना दिसत नाही.

त्यासाठी वरील कृषी तालुका अधिकारी दीपेश देवरे यांच्यावर आठ दिवसाच्या आत विभागीय चौकशी करून महाराष्ट्र नागरी सेवा ( शिस्त व अपील ) नियम १९७९ अंतर्गत सेवेतून बंडतर्फ (Dismissal) करण्यात यावे अन्यथा छावा मराठा युवा महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे विक्रम पाटील बामणीकर छावा मराठा युवा महासंघ उपजिल्हाप्रमुख नांदेड यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी आता नायगाव तालुका कृषी अधिकारी यांच्यावर कोणती कारवाई करतील याकडे नायगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!