ताज्या बातम्याधार्मिकनांदेडनायगाव

कोलंबी येथे गुरुपौर्णिमे निमित्त अलोट भक्तीचा महापूर.

हजारो भाविकांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ.

कोलंबी बाळासाहेब पांडे फोटो

कोलंबी तालुका नायगाव येथे प्रसादबन महाराज पुण्य तिथी व गुरुपौर्णिमा निमित्त भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री १०८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज यांच्या पावन उपस्थितीत भक्तिभावाने ओथंबलेल्या वातावरणात अलोट भक्त गण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.यदुबन महाराज गुरुंच्या दर्शनासाठी तब्बल ५०० मीटरहून अधिक रांगा लागल्या होत्या. भाविकांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात भजन, कीर्तनाचा आनंद घेतला. महाप्रसाद वितरणाचाही मोठा कार्यक्रम या वेळीपार पडला.कोलंबी ग्रामस्थ यांनी तण मनाने सेवा केली.

शिस्तबद्धतेने व भक्तीभावाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नायगाव पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हळदा येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

हळदा या कंधार तालुक्यातील सिद्ध तीर्थधाम मठात देखील महंत विशुद्धानंद महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. येथेही भजन, कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!