ताज्या बातम्यानांदेड

एम आय एम च्या यशाने माहुरात जल्लोष ; राज्यात मिळालेल्या यशाने सर्वधर्मीयांचा एमआयएम कडे कल वाढला.

श्रीक्षेत्र माहूर  : जयकुमार अडकिने

महाराष्ट्र राज्यात झालेल्या निवडणुकात एमआयएम पक्षाने भरघोस यश मिळविल्याने एमआयएमचे जिल्हाध्यक्ष सय्यद मोइन सहाब यांच्या मार्गदर्शनाखाली माहूर शहरात ढोल ताशे बँड लावून फटाके फोडत हजारोच्या संख्येने युवकांनी जमा होऊन हजरत टिपू सुलतान र आ चौकात जल्लोष साजरा केला

महाराष्ट्र राज्यात झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने 126 जागावर विजय मिळविला तसेच नांदेड शहरातही 15 जागावर विजय मिळविल्याने पक्षाची राज्यात ताकद वाढत असल्याने सर्व धर्मीय नागरिकांचा एमआयएम पक्षाकडे कल वाढला असून माहूर तालुका एमआयएमचे तालुका अध्यक्ष सज्जाद भाई शेख अजीज तसेच युवा नेते इरशाद भाई मकरानी यांच्या नेतृत्वात युवकांनी हजरत टिपू सुलतान र आ चौकात जमा होऊन ढोल ताशे फटाक्याच्या गजरात प्रचंड जल्लोष साजरा केला

यावेळी एमआयएमचे तालुका अध्यक्ष सज्जाद भाई युवा नेते तथा भावी नगराध्यक्ष इरशाद भाई मकरानी बबलू टेलर,फैजुल्ला खान,शहजाद नवाब,अज्जू भाई,अय्युब बाबा,अजिस शेख, शाहिद लाला,अरशद खान,सोहेल एस आर के अर्सलान शेख, शोएब शेरा,बुरहान मिर्झा, दानिश डीजे शब्बीर शेख,लाइक सौदागर,अम्मू सौदागर, मूस्तकीम भाई,जम्मू,भाई,तौफिक बागवान, शाहिद सौदागर,रहीम शेख,फैजान लाला , साबीर भाई, यांचे सह सर्व धर्मीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!