ताज्या बातम्यानांदेडनायगाव

मराठी शाळा वाचवून – मुलांचे बालपण, संस्कार आणि संस्कृती वाचवा!.

मराठी शाळा वाचवून – मुलांचे बालपण, संस्कार आणि संस्कृती वाचवा

— बाळासाहेब पांडे

नायगाव

“मराठी माध्यमाची शाळा म्हणजेच मराठी माणसाची जडणघडण करणारी शाळा आहे,” असे मार्मिक मत दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांनी व्यक्त केले.

ते बोलत होते – “मराठी माध्यमांच्या शाळा वाचविण्याची पालकांची जबाबदारी आणि शासनाची भूमिका” या विषयावर आयोजित परिसंवादात.

 

🔹 अध्यक्षपद: मुख्याध्यापक व्यंकट आनेराये

🔹 उद्घाटक म्हणून: दैनिक युगांतरचे ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रघुनाथराव सोनकांबळे हे होते, महामानवांच्या प्रतिमेपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निमित्त:होते प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांचा नाममात्र वाढदिवस साजराकृण

सेवानिवृत्त नायब तहसीलदार राम पंगे, रा.ना. मेटकर यांचा सत्कार करण्यात आला…..

बाळासाहेब पांडे पुढे म्हणाले:

मराठी भाषेचे महत्व

अबाधित जतन करायचे असेल, तर मराठी माध्यम शाळा टिकवल्या पाहिजेत. मातृभाषेतील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपुलकी, संस्कार व संस्कृतीची जडणघडण होते.

इंग्रजीचा अभ्यास गरजेचा आहे, पण इंग्रजी संस्कृतीचा अंधानुकरण घातक आहे.असा परखड विचार त्यांनी व्यक्त केला.

🔸 रघुनाथराव सोनकांबळे यांचा इशारा:

इंग्रजी शाळांचे वाढते आकर्षण म्हणजे बहुजन समाजासाठी शिक्षणाची दरवाजे बंद होण्याची शक्यता!मराठी शाळा बंद पडू नयेत यासाठी पालकांनीच पुढे येऊन पाठबळ द्यावे.

🔸 प्रा. डॉ. शंकर गड्डमवार यांचे मनोगत:

मराठीचे गोडवे गाणारे नेते प्रत्यक्षात मात्र मराठी शाळांकडे दुर्लक्ष करत आहेत.मी तसे न करता माझ्या स्वतःच्या मुलाचा मराठी शाळेत दाखल करून समाजा पुढे उदाहरण निर्माण केले.असे ते म्हणाले

🔸 मुख्याध्यापक व्यंकट आनेराये यांचा अध्यक्षीय समारोप:

इंग्रजी माध्यम नसले तरी इंग्रजी शिकता येते, पण मराठी शाळा नसल्या तर शुद्ध मराठी शिकणे कठीण जाते.असे सांगत इंग्रजी शाळांनी बालपण हिरावले असून, त्यांचा प्रसार पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या जोरावर चालतोय.असा विचार मांडला.या वेळी माधव बैलकवाड यांनी प्रास्ताविक, तर, डॉ गायकवाड,नेहरू सर, भा. ग. मोरे, आदीने विचार व्यक्त केले.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:

डॉ. पी. पी. गायकवाड, रामचंद्र नेहरू, भा. ग. मोरे, माधव बैलकवाड, माधव मामा कोकुर्ले, अॅड. बापूराव वाघमारे, इंजी. शंकर माळगे, होकर्णे सर, यशवंत डुमणे, शिंदे मिल्ट्रीमन, डॉ. नागनाथ मनुरे, परमेश्वर वाघमारे, डॉ. रुपेश गड्डमवार, नंदाताई गड्डमवार, प्रा. प्रीती गड्डमवार आदींची उपस्थिती होती.

डॉ. गड्डमवार यांच्या वतीने सेवानिवृत्त नायब तहसीलदार राम पंगे यांचा हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भीमराव बैलके यांनी केले. शेवटी मराठी शाळा वाचवण्यासाठी गावोगाव जनसंवाद यात्रा काढून उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!