नायगाव :- बाळासाहेब पांडे
नायगाव तालुक्यातील बरबडा व टाकळी येथे गोदावरी नदीच्या पात्रातून पाच जंक्शन बोटीच्या सहाय्याने बेसुमार वाळूचा उपसा सुरू केला असल्याची बातम्या अनेक प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी तातडीने कारवाई करण्याचे फर्मान दिले. त्यानुसार लोहा व नायगाव तहसीलदारांच्या संयुक्त पथकाने दि.१९ एप्रिल रोजी धाड टाकून कारवाई केली. कार्यवाही जरी केली असली तरी नायगाव तहसीलदार यांनी टाकळी येथे गोदावरी पात्रातून एक बोट व यांत्रिक इंजिन यासोबतच येळी येथून दोन इंजिन जप्त करण्याची कारवाई करून पथकाने अवैधरित्या वाळूचा उपसा करणाऱ्यांना धक्का दिला आहे. पाण बरबडा येथे पकडून सोडून दिलेल्या बोटी या वर मात्र कमालीची गुप्तता पाळण्यात आली त्यामुळे नागरिकांमधून उलट सुलट विधान केले जात आहे.हा प्रकार घडल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शि सामाजिक कार्यकर्त्या सोनाली हंबर्डे यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले
नायगाव व लोहा या दोन्ही तालुक्यातील महसूल यंत्रणेने आपली यंत्रणा कायम स्वरुपीदक्ष ठेवणे गरजेचे आहे. मागील एका
महिन्यापासून लोहा आणि नायगाव तालुक्यातील वाळू माफियांनी येळी येथे गोदावरी पात्रातील वाळू संपुष्टात आणली आहे.महसूल व पोलिस यंत्रणा याना हाताशी धरून बरबडा येथे गोदावरी पात्रातूनही वाळूचा उपसा सुरू ठेवला आहे. या पात्रात सुरुवातीला रात्रीच्या वेळी पाच जंक्शन बोटीच्या सहाय्याने बेसुमार वाळूचा उपसा करण्यात आला. महसूल व पोलीस यंत्रणेच्या पाठबळावर हिम्मत वाढलेल्या वाळू माफियांनी भरदिवसा वाळू काढल्या नंतर
पाच जंक्शन बोटीच्या माध्यमातून नियमित ५०० ब्रास वाळूचा उपसा करून तो येळी भागात स्टॉक केला.नंतर तो नायगाव, लोहा, मुखेड व देगलूर तालुक्यात वितरीत केला जात होता. या सगळ्या प्रकरणाचा नागरीकांनी भांडाफोड केल्यानंतर
‘जिल्हाधिकारी महोदय जागे झाले आणि कार्यवाहीचे फर्मान काढले.
जिल्हाधिकारी यांचे फर्मान निघताच झोपेचे सोंग घेऊन दुर्लक्ष करणारे नायगाव महसूल विभागाने नावीलजाने का होईना लोहा तहसील सोबत संयुक्त कारवाई केली.नायगाव तहसीलदार व लोहा तहसीलदार यांच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही केली .

