
नायगाव : नागेश कल्याण
तालुक्यातील कुंटूर पोलीस स्टेशन वतीने लोहपुरुष लोकनेते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एकता दौडचे आयोजन शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 07.00 वाजता लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती अनुषंगाने *RUN FOR UNITY* (एकता दौड) याचे आयोजन हे कुंटूर बसस्टँड ते लोकडेश्वर मंदीर वरून परत येऊन जिनिंग दरम्यान ठेवण्यात आले आहे. या दौडचा समारोप कुंटूर येथील जिनिंग सुत गिरणी परिसरात करण्यात येणार आहे. या एकता दौड run for unity मध्ये आपण सर्व प्रतिष्ठीत नागरीक, सर्व पत्रकार बांधव, विद्यार्थी, पोलीस भरती व आर्मी भरती सराव करणारे युवक, युवती, व परिसरातील कर्मचारी वर्गाने आपला सहभाग मोठ्या संख्येने नोंदवून आपली अखंडता व एकता दाखवून देण्याचे आव्हान कुंटूर ठाणे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.


