ताज्या बातम्यानांदेड

कनिष्ठ अभियंत्याच्या सतर्कतेमुळे वीज समस्येतून ग्राहकांची सुटका ! .

वाई येथील अभियंता वैभव कुलकर्णी यांच्या कार्याबाबत ग्राहकात समाधान .

   माहूर : जयकुमार अडकिने

    माहूर तालुक्यातील महावितरणच्या वाई बाजार सब स्टेशन अंतर्गत वीज समस्येच्या समस्या सोडवून ग्राहकांना अखंडीतपणे चोख वीजसेवा मिळण्यासाठी कनिष्ठ अभियंता वैभव कुलकर्णी यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याने वाई बाजार सब स्टेशन अंतर्गत नगण्य वीज समस्या राहिल्याने व त्या सोडविण्यासाठी तत्परता दाखविण्यात येत असल्याने ग्राहकातून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

वाई बाजार सबस्टेशन अंतर्गत ५९ गावाचा समावेश असून बहुतांश गावे ही डोंगरदऱ्यात असल्याने वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात व्यत्यय येत असे त्यामुळे वीज ग्राहकांना वीज समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र दीड वर्षापूर्वी वाई बा. सबस्टेशन मध्ये रुजू झालेले कर्तबगार अभियंता कर्तव्यावर रुजू होताच सब स्टेशन अंतर्गत सर्वच गावातील नागरिकांना सुरळीत अखंडित वीज सेवा देण्यासाठी त्याने प्रत्येक गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांना होणारे गैरसोयी बाबत सर्व अभ्यास केला व ५९ पैकी ३० गावात नवीन वीज वाहिनी ११ केव्ही उच्च दाब हाय टेन्शन लाईन व काही खेड्यापाड्यांमध्ये ज्या ठिकाणी नवीन रोहित्रीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी नवीन ट्रांसफार्मर बसून तसेच नवीन गावठाण फिडर २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा नागरिकांना उपलब्ध व्हावा म्हणून अनेक ठिकाणी वीज वाहिनी उभा करताना अडथळा व येणारी अनेक ठिकाणी अडचण सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन नागरिकाच्या हितासाठी आहे असे समज देऊन आर डी एस योजनेअंतर्गत कामे करवून घेतली.

सबस्टेशन वाई बा. गावात मध्ये ५ मेगावॅट सौर ऊर्जा पासून माहूर तालुक्यातील अनेक गावांना वीज पुरवठा मिळावा या उद्देशाने सूर्य पासून तयार होणारी वीज निर्मितीचे काम सर्व अडचणीवर मात करून काम संपूर्ण काम करून घेतले तसेच १३२ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी काम लवकरात लवकर व्हावा म्हणून ते वरिष्ठ अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नाची पराकाष्ठा करतांना दिसतात. विद्युत वाहिनीचे तात्काळ सेवा देण्यासाठी रात्री बेरात्री ३३ केव्ही लाईन वर स्वतः जाऊन फॉल्ट काढून लाईन सुरु करणारे कदाचित ते पहिले अभियंता असावेत.

अनेक गावांमध्ये जाऊन महावितरण कंपनीचे थकीत वीज बिल भरा आणि महावितरण कंपनीला सहकार्य करा असे प्रबोधन करतात त्यासोबत सर्व जिल्हा परिषद शाळा महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी जाऊन विद्युत सुरक्षा बाबत अनेक प्रेरणादाय प्रबोधन कार्यक्रम राबविल्याने वाई बा. सब स्टेशन अंतर्गत वीज ग्राहकामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील प्रमुख समस्या असलेल्या वीज समस्येतून ग्राहकांना दिलासा मिळाल्याने लघु उद्योजक, व्यवसायिक, शेतकरी यांना खूप मोठा लाभ होत असल्याने माहूर तालुक्याच्या विकासात त्यांचा प्रत्यक्ष हातभार लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिक अभियंता कुलकर्णी यांचे कौतुक करत असल्याचे सर्रास दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!