
नायगाव
ग्रामीण भागातील किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिससाठी शहरात यावे लागत असल्यामुळे। त्यांना वेळेवर उपचार मिळणे कठीण जात आहे. शिवाय आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये डायलिसिस सुविधा उपलब्ध करून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी खा. प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
खा. रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये किडनी विकार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच अशा रुग्णांमध्ये दिवसेंदिवसभर पडत आहे. या आजारांवर उपचार करण्यासाठी वेळोवेळी त्यांना शहरात यावे लागत आहे. खासगी रुग्णालयात डायलिसिस सुविधा घेण्यासाठी लागणारा खर्च त्यांना परवडणारा नाही.
डायलिसिस यंत्रणा ग्रामीण रुग्णालये तसेच उपजिल्हा रुग्णालयांमध्ये असणे गरजेचे असून प्रत्येक तालुक्यातील रुग्णालयांमध्ये ही सुविधा तत्काळ उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून अशा रुग्णांना वेळेत उपचार मिळू शकेल. शिवाय त्यांचे जीवनमान सुधारेल.
या निवेदनाची तत्काळ दखल घेऊन डायलिसिस सुविधा ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी खा. रवींद्र चव्हाण यांनी केली.

