
नांदेड :- पैशाच्या मोहापोटी आणि नोकरी जाईल या भीतीपोटी तिसरी मुलगी विकल्याप्रकरणी दोघांविरोधक नांदेडच्या भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुलगी विकणाऱ्या वडीलाच गजानन वांजरखेडे आहे तर मुलगी विकत घेणाऱ्यां देविदास जोशी असे आहे.

अल्पवयीन मुलीचे वडील हिंगोली येथे महसूल विभाग दुय्यम निबंध कार्यालयात अनुकंपावर गेल्यावर शिपाई म्हणून भरती झाले आहेत. गजानन वांजरखेडे याला एक मुलगा आणि दोन जुळ्या मुली झाल्या आहेत, यातील एक जुळी मुलगी विकल्याप्रकरणी गजानन वांजरखेडे यांची पत्नी सुरेखा वांजरखेडे यांच्या तक्रारीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गजानन वांजरखेडे व त्यांची पत्नी सुरेखा वांजरखेडे गेल्या आठ वर्षापासून वेगळे राहत आहेत.
गेल्या वर्षी पती गजानन वांजरखेडे याला अनुकंपा खाली शिपाई म्हणून नोकरी लागल्याने हे प्रकरण वर आले आहे. आता पोलिसांनी त्या आठ वर्षीय मुलीला ताब्येत घेऊन एका सेवाभावी संस्थेत ठेवल आहे. माझी मुलगी मला परत देण्यात यावी अशी मागणी मुलीची आई सुरेखा वांजरखेडे यांनी केले आहे.

