
नायगाव बाळासाहेब पांडे
कोलंबी गावातील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल मधुकर बेंस यांनी आपल्या गावातील दरेगाव पाटी ते सरकारी दवाखान्यापर्यंत जाणाऱ्या सीसी रस्त्याचे काम निकृष्ट,गैरप्रकार करीत प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात दिनांक २२ जुलै २०२५ पासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग, नायगाव कार्यालया समोर अमर्याद उपोषण सुरू केले आहे.
बेंस यांनी यासंदर्भात यापूर्वी १६ जून २०२५ व २४ जून २०२५ रोजी सविस्तर अर्ज सादर केले होते. त्यांच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, गावातील दवाखान्यापर्यंत जाणारा रस्ता खराब अवस्थेत असून, संबंधित रस्त्याच्या आणि ड्रेनेजच्या कामासाठी सरकारकडून मंजूर असलेला निधी असूनही या कामास बोगस पद्धतीने सुरुवात केली .
बेंस यांच्या मते, “दवाखान्यापर्यंत पोहोचणारा रस्ता हा अनेक ग्रामीण नागरिकांसाठी जीवनरेखा आहे. रुग्णांच्या हालचालीस अडथळा निर्माण होतो आहे. सार्वजनिक आरोग्याची ही थट्टा असून, प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे.” ही बाब लक्षात घेऊन बैस, त्यांनी २२ जुलै रोजी उपोषण सुरू केल्याची माहिती मिळाली असून, तत्काल कार्यवाही न झाल्यास हे उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या निवेदनावर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध अधिकाऱ्यांनी प्राप्ती दर्शक सही केली आहे.प्रशासनाने ता त्काळ दखल घ्यावी, अन्यथा जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले जाईल, अशी भूमिका स्थानिक ग्रामस्थांनीही व्यक्त केली आहे.

