ताज्या बातम्यानांदेडनायगाव

हुस्सा येथे गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन सुरू.

आडकिने शंकर पाटील

हुस्सा परिसरातील गोदावरी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने हा प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नदी पात्रात तराफा व पाईपच्या साहाय्याने दोन ठिकाणी रेती उपसा केला जात आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या उत्खननामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होत असून पर्यावरणीय हानी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही संबंधित प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अवैध रेती उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून नदीकाठच्या शेती व परिसरालाही धोका निर्माण होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून  या अवैध उत्खननवर काय  कारवाई करावी, करतील या कडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!