
कुंटूर :
गावचे मंत्रालय संबोधल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक (केंद्र चालक) म्हणून कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहेवारी मिळणारे तुटपुंजे मानधन तेही वेळेवर मिळत नसल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे . . मागील जून महिन्यापासून एक दमडी देखील मानधन मिळाले नाही त्यामुळे संगणक परिचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे . दरम्यान काळात नवरात्र महोत्सव विजयादशमी हे सणासुदीचे दिवस आहेत मात्र संगणक परिचालकांना महाराष्ट्र शासनाकडून दिले जाणारे मानधन कधीही वेळेवर मिळत नाही त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात महत्त्वाची भूमिका बजावणारे संगणक परिचालकांचे पुरते बेहाल होत असल्याचे दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी सर्व संगणक परिचालकांचे जून जुलै ऑगस्ट २०२५ या तीन महिन्याचे मानधन लवकरात लवकर अदा करावे अशी मागणी होत आहे .
गतवर्षीचे तीन महिन्याचे मानधन रखडले ?
गतवर्षी इ आर पी प्रणाली उघडली जात नव्हती त्यामुळे इन्व्हाईस करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत संचालक पंचायत राज पुणे यांना संगणक परिचालकांनी आवश्यक ती माहिती पुरवली तरीपण त्या तीन महिन्याचे मानधन अद्याप मिळाले नाही. याबाबत विचारणा केली असता काही संगणक परिचालकांचे बँक खाते नंबर अद्यावत नाहीत म्हणून पुणे कार्यालयाने वेळ मारून नेला याचा पाठपुरावा महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तसेच जिल्हा परिषद आर जी एस ए विभागातून तात्काळ करावा आणि गतवर्षीचे जुलै ऑगस्ट सप्टेंबर २०२४ चे थकीत मानधन तात्काळ अदा करावे अशी मागणी होत आहे.

