
नायगाव : बाळासाहेब पांडे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निर्घृण खुनाला आज 20 ऑगस्ट रोजी बारा वर्षे पूर्ण होत आहेत. या खुनामागील मुख्य सूत्रधार मोकाट आहेत म्हणून नायगाव अंनिसच्या वतीने मा तहसीलदार नायगाव यांना निवेदन देण्यात आले
भारतामध्ये कोणत्याही पुरोगामी विचारवंताची दिवसाढवळ्या हत्या केली जात आहे पण पण केंद्र व राज्य सरकारे त्यांच्या खुनासाठी जबाबदार असणाऱ्या गुन्हेगारास पकडण्यासाठी वर्षानुवर्ष बोटचेपे धोरण अवलंबत आहे ही बाब पुरोगामी महाराष्ट्र आणि भारतासाठी अतिशय निंदनीय आहे खुनाचा तपास व्हावा मुख्य सूत्रधारांना पकडण्यात यावे यासाठी विचाराच्या अनुयायांनी त्यांच्या खुनाचा तात्काळ तपास व्हावा म्हणून दरवर्षी लोकशाही मार्गाने आंदोलने केली जातात निवेदने दिले जातात पण सरकार या बाबतीमध्ये जबाबदारीने तपास करण्यास तयार नाही.
देशामध्ये पुरोगामी विचारवंतांना सुनियोजित कट करून संपविले जात आहे त्यामध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर कॉम्रेड गोविंदराव पानसरे, प्रा एम एम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे जीवन जाणून-बुजून संपविण्यात आले आहे. जोपर्यंत यांचे मारेकरी पकडले जात नाहीत तोपर्यंत विवेकवादी कार्यकर्त्यांना धोका आहे
डॉक्टरांना नरेंद्र दाभोळकरांच्या खून खटल्यामध्ये वीरेंद्र सिंग तावडे संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांची जी सुटका झाली आहे त्यांच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये सीबीआयने दाद मागितली नाही हे अक्षम्य दिरंगाई आहे या सर्वांच्या विरोधामध्ये पुन्हा याचिका दाखल करावी आणि जादूटोणा विरोधी कायदा कर्नाटक व गुजरात या राज्यांमध्ये देखील करण्यात यावा
भारतामध्ये बुवाबाजीच्या घटनांच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. देशातील भोळे भाबडे लोक फसवले जात आहेत या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायदा देशभरात लागू करावा अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन नायगाव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर शंकर गड्डमवार आणि सचिव भा ग मोरे यांच्या वतीने निवेदन देऊन ही मागणी शासनापर्यंत पोहोचवण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे

