ताज्या बातम्यानांदेडनायगाव

छावा मराठा संघटनेच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी बेलकर, जिल्हाध्यक्षपदी डोईफोडे, ; तर मराठवाडा कार्याध्यक्षपदी हंबर्डे, युवा अध्यक्षपदी शिंदे व शहराध्यक्षपदी ढगे यांची सर्वानुमते निवड.

नायगाव :  बाळासाहेब पांडे

छावा मराठा संघटनेच्या नायगाव तालुका अध्यक्षपदी शेषराव पाटील बेलकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. संघटनेची बैठक शासकीय विश्रामगृह, नर्सी येथे प्रदेशाध्यक्ष राजेश जी मोरे यांच्या उपस्थितीत पार पडली.                    या बैठकीत मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून प्रा. राजेश पाटील हंबर्डे, जिल्हा अध्यक्ष म्हणून शिवानंद पाटील डोईफोडे, नायगाव युवा तालुका अध्यक्ष म्हणून किरण शिंदे, तसेच नायगाव शहर अध्यक्ष म्हणून पंडीत पाटील ढगे यांचीही सर्वानुमते निवड करण्यात आली.                             बैठकीस तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.                      निवडीनंतर बोलताना तालुका अध्यक्ष शेषराव पाटील बेलकर यांनी संघटनेच्या कार्याचा विस्तार करून मराठा समाजातील युवकांना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा आणि समाजाच्या हक्कांसाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.      संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीबद्दल सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून आगामी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!