ताज्या बातम्यानांदेडनायगाव

साईनाथ महाराजांनी घेतलेला वसा जगाला प्रेरणा देईल : श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन.

जयकुमार अडकिने

: श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास (धोंडे पुरुषोत्तम मास) निमित्त दि. 17 मेपासून सुरू असलेल्या भव्य चुलबंद धोंडे जेवण महाअन्नदान कार्यक्रमास भगवान श्री दत्तप्रभूंचे निद्रास्थान असलेल्या श्री देवदेवेश्वर संस्थानचे महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांनी सुरू केलेले अन्नदान, स्वच्छता अभियान व सप्तसूत्री कार्यक्रम हे एक दिवस संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन केले.

महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर पुढे म्हणाले की, श्री चक्रधर स्वामी महाराज यांनी सुमारे नऊशे वर्षांपूर्वी तब्बल 65 वर्षे स्वच्छतेचा संदेश दिला होता. त्याच आदर्शातून संत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छता अभियान राबवून समाजाला नवी दिशा दिली. याच परंपरेचा आदर्श घेऊन राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांनी स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती, अन्नदान, महिला सक्षमीकरण, वृक्षारोपण, देशभक्ती, शिक्षण व जीवांचा उद्धार अशी विविध समाजोपयोगी कार्ये सुरू केली आहेत. ही कार्ये केवळ समाजासाठी नव्हे तर जगासाठी प्रेरणादायी ठरणारी आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

तसेच साईनाथ महाराज ज्या समर्पित भावनेने हे कार्य करत आहेत, त्यामुळे जीवांचा उद्धार होऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडेल आणि जग त्यांच्या कार्यातून निश्चितच प्रेरणा घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेवटी सर्व दत्तभक्तांच्या भक्तीने दत्तप्रभू प्रसन्न होऊन संपूर्ण मानवजातीचे कल्याण करो, अशी प्रार्थना त्यांनी श्री दत्तप्रभू चरणी केली.

या प्रसंगी महंत मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर, राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर, भाऊराव पाटील हाडसणीकर, पत्रकार नंदकुमार जोशी, विजय आमले, नानासाहेब पांडे, ईलियास बावाणी, जवाहरलाल जयस्वाल, एस. एस. पाटील, सुप्रसिद्ध रांगोळीकार सुरेश आराध्ये ,बंडू भाऊ कविश्वर,छगण भालेराव यांच्यासह मान्यवर व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!