
नायगाव:
गडगा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असून .संबधिताकडून हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याची बाब पहावयास मिळत आहे.आर्थिक लाभासाठी बेकायदेशीर वृक्षतोडीला परवागी दिली. कि काय अशा प्रश्न निर्माण झाला असून.विभागीय वनाधिकाऱ्यांनी लक्ष देवून कायदेशीर व प्रशासकीय पावले उचलण्याची गरज आहे.
अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून.धोक्याची घटा मोजत आहे.वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत.स्थानिक वातावरणावरही विपरीत परिणाम होत आहे.या प्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी लक्ष देवून अवैध वृक्षतोड थांबवून कडक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी होत आहे.
वनविभागाचे कर्मचारी जबाबदारी नसल्यासारखे वागत आहे.परिसरात सुरू असलेल्या अवैध वृक्षतोडीला काही वनविभागाचे कर्मचारी गुप्त पाठीबा देत असल्याचे बोलले जाते.मोठ – मोठे झाडे तोडली जात असताना.संबंधित ठिकाणी वनविभागाचे कर्मचारी साधी भेट सुद्धा देत नाहीत.
गडगा (ता.नायगाव) येथून झाड्याच्या खंडाची कटाई करून कृष्णूर येथील काही कंपन्याना जळतणासाठी पुरवठा केला जात आहे.रात्रीच्या वेळी ट्रकद्वारे लाकूड बाहेर अन्या ठिकाणी जात आहे.संबधित अधिकारी मात्र मौन बाळगत आहेत.असे एका स्थानिक नागरिकाने सांगितलें आहे.

