
*माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळेच आज एज्युकेशन सोसायटी नायगावचा वटवृक्ष बहरला–खा. रविंद्र पा. चव्हाण*
नायगाव बाळासाहेब पांडे फोटो
— कै. बळवंतराव चव्हाण, कै. रामचंद्र राव पा. सुजलेगावकर, कै. नागोराव जाधव उमरदरीकर,कै. गिरीराव देशपांडे नांवदीकर यांच्या संकल्पनेतून एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित, जनता हायस्कूलची स्थापना ११ जून १९५९ ला एका बंद पडलेल्या काॅटन मिलमध्ये सुरू झाली. पारतंत्र्याच्या जोखडातून १९४७ देश मुक्त झाला. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत असे. अशा परिस्थितीत नायगावची जनता हायस्कूल नायगाव या बाजारपेठेत स्थापन झाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे एक प्रकारचे वरदानच होते.
जनता हायस्कूल नायगावच्या शाळेत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या १९६१,१९६२ व १९६३ घ्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी २ जानेवारी २०२५ एक मेळावा घेऊन जुन्या आठवणींची शिदोरी घेऊन स्मरणिका काढण्याचे ठरविले.
त्यानुसार काल दि. ८ जून २०२५ रोजी कै. बळवंतराव चव्हाण सभागृहात स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन मा. खा. रविंद्र पा. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत घेण्यात आले होते. अध्यक्षीय भाषणात खा. रविंद्र पाटील चव्हाण यांनी, *”माजी विद्यार्थ्यांच्या योगदानामुळेच आज एज्युकेशन सोसायटी नायगावच्या २७ शाखा असून आज त्याचा वटवृक्ष बहरला आहे”,* असे गौरवोद्गार काढले आहेत.
या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक मा. डॉ. जगदीश कदम, ज्येष्ठ साहित्यिक नांदेड, यांच्या हस्ते झाले तर या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गोपाळराव कदम, दत्ता तुमवाड सामाजिक कार्यकर्ते अणि श्री श्रीराम करडखेडकर, शं.ल. अंजणीकर, गोविंद मेथे, प्रा. माधवराव गोपछडे, द.भा. धनजे, देविदास बोमनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
*६६वर्षांनी जनता हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या हृदयस्पर्शी आठवणी*
माजी विद्यार्थी सर्वश्री डॉ . पांडरंग जाधव उमरदरीकर, बळवंतराव मोरे, हणमंतराव खंडगावकर यांनी जनता हायस्कूल क.म.वि.च्या प्रगतीचा व विस्ताराचा आढावा घेतला . आपल्या मनोगतात डॉ . पि.एम. जाधव यांनी जनता हायस्कूल व नायगाव नगरीच्या आठवणींचा उजाळा दिला. प्रकृती बरी नसतानाही खंडगावकर सरांनी स्मरणिकेचे या संपादनाचे काम अगदी उत्तम प्रकारे केल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. श्री खंडगावकर सरांनी या संस्थेतून अनेक मोठमोठी व्यक्तिमत्व घडली. शिक्षण, शेती , राजकारण , उद्योग व व्यवसायात नेत्रदीपक प्रगती केली.
प्रा. डॉ. जगदीश कदम यांनी साहित्यातून शेक-यांचे दु:ख मांडले पाहिजे तेच खरे साहित्य आहे आणि शेतकरी जगाचा पोशिंदा आहे पण सध्या त्याला आत्महत्या कराव्या लागतात कारण निसर्ग व सरकारी धोरणे त्याच्या जीवावर उठली आहेत असे म्हटले आहे तर प्राचार्य गोपाळराव कदम यांनी संस्थेची सुरूवात व जडण घडण याबद्दल विचार मांडले. संस्थेत अनेक शाखा असून ग्रामीण भागात एवढ्या मोठया प्रमाणात कुठंही सोयी नाहीत असे आपल्या मनोगतात म्हटले आहे.
सौ.शोभाताई उज्वल कदम यांनी अतिशय अडचणीत “झेप” या स्मरणिकेचे प्रकाशन केल्याबद्दल श्री व सौ. खंडगावकर यांनी त्यांचा संपूर्ण आहेर देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आरोही राठोड तीरंदाजीत सुवर्ण पदक मिळाल्या बद्दल तिचा पण सत्कार करण्यात आला . याप्रसंगी मारोतराव धुप्पेकर, हणमंतराव पो.पा. डोंगरगावकर, गंगाधर डोंगरगावकर, हणमंतराव कदम इत्यादींनी ६६ वर्षांपूर्वीच्या जनता हायस्कूलच्या सहवासातील हृदयस्पर्शी आठवणींना उजाळा दिला तर दत्ता तुमवाड यांनी झेप या स्मरणिकेचे साक्षेपी समिक्षण करतांना, ” भौतिक तेला अध्यात्माची जोड दिली पाहिजे”, असे म्हटले आहे.
या कार्यक्रमाला सर्व श्री प्रा . के.एन पाटील अंतापूरकर, गिरीश चौडेकर, सुरेश पेंडकर, भुजंगराव डांगे माजी मुख्याध्यापक, व्यंकटराव चिवडे, किशन कदम, दि.सि. लोंड, सा.रा. जाधव, ज्ञानोबा शिंदे, कुंटूरकर साहेब, श्रीकांत आरोळे, सौ. सरस्वती खंडगावकर, श्रीमती यशोदाबाई डोंगळीकर
याशिवाय या कार्यक्रमास परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन भाऊराव मोरे यांनी केले.
भाऊराव मोरे यांच्या भावना
उपस्थितांच्या मनाला भावल्या या वेळी भाऊराव मोरे यांनी आपल्या मनोगतात, बोलताना म्हणाले की “कै. बळवंतराव चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला. यावर विषय मांडतानाजून १९६५ पासून शाळा चालवायची असेल तर मुख्याध्यापक पदवीधर आणि तोहि बी.एड्. म्हणजे प्रशिक्षित असला पाहिजे, असा जी.आर. शिक्षण संचालक,पुणे यांनी काढला. त्यावेळी श्री श्रीराम करडखेडकर एकमेव प्रशिक्षित असल्याचे समजले. पाटलांनी त्यांना निमंत्रित केले. त्यावेळी शाळेची परिस्थिती बिकट होती. करडखेड सरांनी हे शिवधनुष्य उचलतांना बळवंतराव चव्हाण यांना एक अट घातली ती म्हणजे,” पाटील साहेब मी हे पद एका अटीवर स्विकारतो. ते म्हणजे शाळेचे ५ वर्ष शाळा माझ्या ताब्यात द्यावी लागेल. तरच मला शाळेला उर्जित अवस्थेत आणता येईल.!” तेंव्हां बळवंतराव चव्हाण पाटील यांनी करडखेड सरांच्या ताब्यात जनता हायस्कूल दिले. खरं म्हणजे शिक्षक भरती/एखाद्या बेशिस्त शिक्षकाला नोकरीवरून काढून टाकणे व सर्व आर्थिक व्यवहार श्रीराम करडखेडकर सरांना ५ वर्ष बहाल केले व अशा रीतीने बळवंतराव चव्हाण पाटील दिलेल्या शब्दाला जागले. त्यावेळी मला, अंजनीकरांना व खंडगावकर सरांना त्यांनीच नोकरीवर घेतले. पाझरणे हा चव्हाण कुटुंबीयांचा स्थायीभाव आहे. अमृतराव चव्हाण, बळवंतराव चव्हाण, वसंतराव चव्हाणांना पासून आताच्या खासदार रविंद्र चव्हाण यांनी हा समाजासाठी ओलावा टिकवून ठेवला. त्याचा मी साक्षीदार आहे”, असे आपल्या मनोगतात मोरे यांनी व्यक्त केले.

