
नायगाव : मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरु असलेल्या अमरण उपोषणाची सरकार दखल तर घेवून मागण्या मान्य तर करतच नाही पण संवादही साधत नाही. त्यामुळे मुंबईच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने दि. २ सप्टेंबर रोजी नायगाव तालुका बंदची हाक देण्यात आली असून जनतेने सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी दि.२९ आँगष्ट पासून मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण सुरु केले आहे. यासाठी हजारो मराठा बांधव मुंबईत आहेत. पण मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक भुमिका घेवून आरक्षणासाठी पुढाकार तर घेतच नाही पण संवादही साधत नाही त्यामुळे मराठा बांधवांचा संयम सुटत असून ते सरकारचा तिव्र शब्दात निषेधही करत आहेत. सरकारला जाग येण्यासाठी व मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा म्हणून दि. २ सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने नायगाव शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. नायगाव तालुका बंदचे निवेदन तहसील कार्यालयात सकल मराठा समाजाच्या वतीने माणिक चव्हाण, अजिंक्य कल्याण, कैलास शिंदे, बंटी शिंदे, शिवराज चव्हाण, किरण येरडे, अरविंद चव्हाण, माधव शिंदे यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले आहे.

