ताज्या बातम्यानांदेड

विद्यार्थी हे माझे दैवत समजून शिक्षकांनी शैक्षणिक कार्य करावे ; गट शिक्षणाधिकारी सुरेश पाटील.

ज्ञानविकासाचा दीपस्तंभ ठरणारी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद गोधामगाव येथे सपन्न .

नायगाव : बाळासाहेब पांडे

शिक्षण परिषद ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्या साठी असून विद्यार्थी हे माझे दैवत समजून शिक्षकांनी शैक्षणिक कार्य केल्यास शिक्षण परिषद प्रभावी ठरणार आहे असे विचारगट शिक्षणाधिकारी सुरेश पाटीलयांनी शिक्षण परिषद बैठकीत मुख्य मार्गदर्शन करताना केले.                                                         जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कोलंबी तालुका नायगाव केंद्राची गोधमगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन ४ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख श्री. राजेश्वर डोमशेर यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. सुरेश पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव ढगे, सेवानिवृत केंद्र प्रमुख रावण चिखलवाड ,केंद्र प्रमुख माधव रेडवाड, प्र.मुख्याध्यापक बाळासाहेब पांडे,सुलभक सचिन तेहरा ,त्र्यंबक स्वामी,अनुपमा बन, शंकर गोपतवाड, महेंद्र बुधपा सर हेउपस्थित होते.मान्यवरांचा सत्कार गोधामगाव चे मू अ शहाजी सुन्पे,सर्व कर्मचारी यांनी केला.                              या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , डिजिटल शिक्षण, ग्रामीण-शहरी शिक्षणातील तफावत, शिक्षक प्रशिक्षण, रोजगाराभिमुख शिक्षण, कौशल्य विकास व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा महेंद्र बुधपा सर यांनी सविस्तर मार्गदर्शन करून केले.                                                     परिषदेमुळे शिक्षणातील गुणवत्ता, प्रवेशयोग्यता आणि समानता साधणे याबाबत दिशा मिळाली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील शाळांनाही स्मार्ट शिक्षणाशी जोडण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.   शिक्षण व्यवस्थेत भेडसावणाऱ्या पायाभूत सुविधांची कमतरता, डिजिटल अंतर, गुणवत्तापूर्ण शिक्षकांची टंचाई या आव्हानांवर उपाययोजना म्हणून सरकारी-खाजगी भागीदारी, ग्रामीण भागासाठी विशेष धोरणे, नवकल्पना आणि मूल्याधिष्ठित शिक्षण यावर भर देण्यात आला.परिषदेत एकमुखी ठरविण्यात आले की, “शिक्षण हेच खरे राष्ट्रनिर्मितीचे साधन असून केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ही ज्ञानविकासाचा दीपस्तंभ ठरणार आहे.”असा संदेश या वेळी देण्यात आला.कार्यक्रम यशस्विते साठी गोधामगाव शाळेचे मु. अ सुनपे सर,सोनमनकर, पुरजवाड,शिंदे मॅडम, मॅडम सह सर्व कर्मचारी,विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!