ताज्या बातम्यानांदेडप्रशासकीय

सिंगम पोलिस अधिकारी मुळे यांच्या बदलीने अवैध व्यवसायिकात फुटल्या आनंदाच्या उकळ्या,             • अवैध व्यवसायाने पुन्हा केले डोके वर काढण्यास सुरुवात!.

अवैध व्यवसायाने पुन्हा केले डोके वर काढण्यास सुरुवा !  • शांतता व सुव्यस्था प्रेमी नागरिकात थोडी ख़ुशी थोडा गम!.

सिंगम पोलिस अधिकारी मुळे यांच्य

• शांतता व सुव्यस्था प्रेमी नागरिकात थोडी ख़ुशी थोडा ग

• नवा पोलीस अधिकारी इट से पत्थर भारी यावा शांतता व सुव्यस्थाप्रेमी नागरिकांना अपेक्षा !

जयकुमार अडकीने ( शांतता व सुव्यस्था विशेष )

माहूर- माहूर येथील प्रभारी पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांच्या बदलीची वार्ता कानी पडताच विविध अवैध व्यवसायीकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून शांतता व सुव्यस्था प्रेमी नागरिकात थोडी ख़ुशी थोडा गम असे वातावरण आहे. अवैध व्यवसायाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने नवा पोलीस अधिकारी इट से पत्थर भारी यावा अशी शांतता व सुव्यस्थाप्रेमी नागरिकांतून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

माहूर तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय वाढत असतांना गुन्हेगारी जगतात माहुरची ओळख होते की काय ? अशी परिस्थिती उद्भवली असतांना माहूर तालुक्यातील जागरूक शांतता व सुव्यस्था प्रेमी नागरिकानी मागणी केल्याने नांदेडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सिंगम पोलीस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांना माहूर पोलीस ठाण्यात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. मुळे यांना मिळालेल्या सवा वर्षाच्या कालावधीत त्यांनी माहूर शहरातील सर्वच अवैध व्यवसायांना आळा घालून अवैध व्यवसायीकांना पोलिसी खाक्या काय असतो हे दाखवून दिले. त्यांच्या कार्यकाळात माहूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व माहूर शहरातील सर्वच अवैध व्यवसायांना चांगलाच आळा बसला होता व धार्मिक सांस्कृतिक उत्सव शांततेत पार पाडले. अन्याय झाल्यास आपल्याला पो. नि मुळे नक्कीच न्याय देतील अशी अन्यायग्रस्त नागरिकांची भावना वाढीस लागून पोलीसावरील नागरिकांचा विश्वास वाढला होता. त्याचीच परिणीती म्हणजे लोकसभा व विधानसभा सार्वत्रिक निवडणुका कोणतेही शांतता सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण न होता अतिशय योग्य पणे कायदा व सुव्यवस्था त्यांना राखता आली. शिवाय माहूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असल्याने दैनंदिन देशभरातून भाविकांची होणारी वर्दळ व वर्षात येणाऱ्या पाच महायात्रा, राजकीय पक्षाच्या, सामाजिक संघटनाच्या मोठ्या सभा आदी बाबी व्यवस्थितपणे सांभाळून जनतेच्या मनात पोलीस प्रशासनाबाबत विश्वास निर्माण केला होता. परंतु प्रशासकीय नियमानुसार स.पो.नि. शिवप्रकाश मुळे यांची अमरावती परिक्षेत्रात बदली झाल्याचे आदेश धडकल्याने विविध अवैध व्यवसायीकांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असून शांतता व सुव्यस्था प्रेमी नागरिकात थोडी ख़ुशी थोडा गम असे वातावरण आहे. अवैध व्यवसायाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी माहूर पोलीस स्टेशनला नवा पोलीस अधिकारी नियुक्त करताना इट से पत्थर भारी नियुक्त करून माहूर शहर व तालुक्यात त्यांनी निर्माण केलेले वातावरण कायम राखण्यास सहकार्य करावे अशी शांतता व सुव्यस्थाप्रेमी नागरिकांतून मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!