ताज्या बातम्यानांदेड

सतत १८ तास अभ्यास उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केले महामानवास अभिवादन..

अंजनखेडच्या सावित्रीबाई फुले विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम.

माहूर- जयकुमार अडकीने

सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त ६डिसेंबर २०२५ रोजी सतत १८ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थाध्यक्षा सौ विमलताई खराटे संस्था सचिव ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्या श्रीमती एन.एस. जयस्वाल व प्रा जयकुमार खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला.

मागील १७ वर्षापासून हा उपक्रम या विद्यालयात अविरतपणे राबविल्या जातो. याव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृती दृढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून चिंतन , मनन व्हावे. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. ह्या उद्दात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.यामध्ये ११वी, १२वी वर्गातील जवळपास १२५ विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवीला.

या सुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी शांततेत व शिस्तीत अभ्यास करून आपल्या आयुष्याच्या शालेय जीवनातील वाचनाचा एक वेगळा आगळा अनुभव घेतला. तसेच अंजनखेड येथील रमाई महीला व तक्षशिला बौद्ध विहार समीती अंजनखेड यांच्या तर्फे उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना एक पेन, एक रजिस्टरचे वाटप करण्यात आहे. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाच्या समारोपा प्रसंगी संस्था सचिव ज्योतिबा खराटे ,प्राचार्या एन.एस. जयस्वाल मॅडम प्रा.जयकुमार खराटे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रेमचंद सुर्यवंशी यांनी केले प्रसंगी कु.स्नेहा जाधव, कु सदफ ईस्माईल शेख या विद्यार्थीनीनी आपला वाचनाचा अनूभव व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.अम्हाला वाचनाची आवड निर्माण होवून अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे सांगीतले. या उपक्रमाचे आयोजन शाळेत झाल्याने वाचनाची संधी मिळाली यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कालेज प्रमुख प्रा.विनोद कांबळे यानी उपक्राची १७ वर्षाची परंपरा अखंड ठेवून वाचन चळवळ दृढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.अध्यक्षीय समारोप प्रसंगी संस्था सचिव ज्योतीबा खराटे यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कोतूक केले. तसेच असाच निरंतर अभ्यास करून शाळेचे ,आईवडीलाचे नाव उज्वल करावे.असा आग्रह धरला.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही व वाचनाशिवाय पर्याय नाही असे ठाम त मांडले.डॉ बाबासाहेब आंबेडकराना प्रेरणास्थानी मानून मार्गक्रमण करण्याचे अवाहन केले या वेळी मंचावर पर्यवेक्षक एन.एम. राठोड सर, प्रा.सतिष सुंकावर प्रा. प्रेमचंद सुर्यवंशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाचे नेतृत्व उच्च माध्यमिक प्रमुख प्रा. विनोद कांबळे यांनी केले. यासाठी प्रा अनिल जाधव प्रा राज कांबळे, प्रा प्रविण बिरादार प्रा अश्विनी गोदरे, प्रा निर्मला राठोड, बाळू कुकडे, किशोरभाऊ यांनी सहकार्य केले. उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना दिनेश मेहेत्रे सर,यांच्या तर्फे फळांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.राज कांबळे यांनी केले. या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हातून, पालक वर्गातून, वाचनप्रेमी वर्गाकडून कौतूकाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!