
नायगाव :
कार्तिकी एकादशी निमित्ताने जागर हरिनामाचा या कार्यक्रमा अंतर्गत नायगाव शहरातील विठ्ठल रुक्मिणी हनुमान मंदिर जुनेगाव येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार विनोदाचार्य रामायणाचार्य ह.भ.प. कृष्णा महाराज राजूरकर यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवाराच्या वतीने कार्तिकी एकादशी निमित्ताने आयोजित जागर हरीनामाचा या कीर्तन सेवेचे आयोजन नायगाव येथील सर्व पत्रकार मित्रांच्या विशेष प्रसिद्धी सेवा सहकार्याने करण्यात येते. पारंपरिक या किर्तन सेवेसाठी यंदा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य तथा विनोदाचार्य किर्तनकार ह.भ.प. कृष्णा महाराज राजूरकर यांच्या कीर्तनाचे आयोजन दि २ नोव्हेंबर रोज रविवारी रात्री ठीक ०८:०० वाजता शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर नायगाव येथे करण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्यात परिसरातील नामवंत व सर्वगुण संपन्न कलाकारांची साथ असणार असून यात स्वरसंगम व स्वरगंगा मित्र मंडळाचे सर्व गुणी कलाकार , मृदंगाचार्य बाळासाहेब पांडे, बाबुरावजी लंगडापुरे, गायनाचार्य प्रा. बिरादार, प्रा.माधव किनाळकर, माधव अप्पा नंदगावकर, नामदेवजी पांचाळ, स्वरगंगा संगीत संचाचे गणेशजी हाके, मृदंगाचार्य विश्वेश्वर जोशी, बालाजी चौधरी, हभप मारोती बालाजी भोस्कर, विकासजी भूरे, चंद्रकांत आमलापूरे, गायनाचार्य रमेश पाटील जाधव, सुभाष पाटील शिंपाळे, साईनाथ पाटील शिपाळे, मृदंगाचार्य नकाते, बासरीवादक विजय द्रोणाचार्य
, शिभप त्र्यंबक स्वामी नंदगावकर, गजानन चौधरी, विकास भुरे , तबलावादक ज्ञानेश्वर बैस, योगेश शिंपाळे, हरीप्रसाद पांडे, प्रा. वसंत माने, दिलीप पा. चव्हाण, अशोक पा. चव्हाण, शंकर अप्पा बेळगे, होळकर मामा, सदाशिव मदेवाड, वाल्मीक मदेवाड, शिवा महाराज, काशीनाथ महाराज, लक्ष्मण पाटील कल्याण, एकनाथ कल्याण, विश्वंभर कल्याण, आर्दीसह परिसरातील गुणी कलावंत यांची साथ संगत लाभणार असून या किर्तन सेवेचा परिसरातील भाविकभक्तांनी लाभ घेण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक नागेश पाटील कल्याण व कल्याण पाटील परिवार नायगाव यांचे वतीने करण्यात आले आहे.

