ताज्या बातम्याधार्मिकनांदेड

निर्माणधीन लिफ्ट स्काय वाकची रेणुका देवी संस्थान वरील भिंत कोसळली!.

श्रीक्षेत्र माहूर : जयकुमार अडकीने

माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरावर जाण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी लिफ्ट आणि स्काय वॉकच्या कामाला मंजुरी देऊन पन्नास ]0कोटी पेक्षा जास्त निधी दिला होता या निधीतून कंत्राटदार गुरुबक्षांनी यांनी मंदिराच्या पश्चिम बाजूचा भाग पोखरून संरक्षक भिंत तात्काळ उभी केली नसल्याने श्री रेणुका माता मंदिराचा जुन्या परकोट ची भिंत पावसामुळे पडल्याने या प्ररकोटला लागून असलेल्या खोल्यातील भाविकांनी दिलेले मौल्यवान पूजेचे साहित्य पातळ समई आणि इतर साहित्य भिंत कोसळल्याने मातीत मिसळले असून मंदिराच्या मुख्य भिंतीपासून थोड्या अंतरावरील भिंत कोसळल्याने मुख्य मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने घडलेल्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे

श्री रेणुका देवी संस्थान वर जाणाऱ्या लिफ्ट आणि स्काय वॉक च्या बांधकामासाठी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी निधी देऊन एका वर्षात काम पूर्ण करण्याच्या सक्त सूचना दिल्या होत्या परंतु गेल्या चार ते पाच वर्षांपासून सदर काम हळूहळू सुरू असल्याने यावर्षी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी करून कंत्राटदार गुरु बक्षांनी यांना काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्याने त्यांनी मुख्य मंदिराच्या पश्चिम बाजूचा भाग पोखरला होता परंतु संरक्षक भिंत आणि काय वॉक च्या कामाला त्यांनी गती दिली नाही परिणामी दि 25 रोजी सायंकाळपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे पोखरून ठेवलेल्या भागाच्या भिंतीखालील माती ढासळल्याने जवळपास 25 मीटर लांब संरक्षित भिंत अचानकपणे कोसळली त्यामुळे या भिंतीला लागून असलेल्या खोल्यात ठेवलेले पूजेचे साहित्य समया आणि भाविकांनी दिलेले पातळी ओटीचे साहित्य आणि पूजेचे सर्व साहित्य भिंतीच्या दगड विटा माती मध्ये मिसळून खराब झाले असून भिंत कोसळल्याने श्री रेणुका मातेच्या मुख्य मंदिराला सुद्धा धोका पोहोचला असेल यात शंका नाही

संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि जिल्हाधिकारी सहाय्यक जिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तत्कालीन विश्वस्तांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याने कंत्राटदारांनी मनमानी पद्धतीने बांधकाम हळूहळू सुरू ठेवत येथील व्यापाऱ्यांना त्रस्त करून सोडले होते कंत्राटदारांनी आधी संरक्षक भिंत उभी करणे ऐवजी काम सुरू असल्याची बतावणी करण्यासाठी विनाकारण मुख्य मुख्य मंदिराच्या संरक्षक भिंतीच्या खालपर्यंत जेसीबी द्वारे खोदकाम केले मजुरा द्वारे खोदकाम करण्याची सूचना ही दैनिक एकमत मधून करण्यात आली होती परंतु सर्व संबंधितांनी पत्रकारांना वेड्यात काढून नागरिकांच्या सूचनाकडे दुर्लक्ष केल्याने ही भयंकर घटना घडली असून सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी मुख्य मंदिराला धोका पोहोचेल अशी घटना घडल्याने भाविकातून प्रचंड नाराजी व्यक्त होत असून संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी लाखो भाविकातून होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!