ताज्या बातम्यानांदेड

आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात शिवसेनेचा राडा ;

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची वाट न बघता आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन केल्याने उबाठा शिवसेना संतप्त.

 

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वैद्यकीय अधीक्ष  यांना सुनावले

श्री क्षेत्र माहूर : जयकुमार अडकिने

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या पंधरवाड्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत असून त्या अंतर्गत माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा आमंत्रित होते परंतु त्यांची वाट न बघता आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करून शिवसेना पदाधिकाऱ्यांना डावल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांचे शिवसेनिकांनी उद्घाटन कार्यक्रमात राडा घालून कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर दुपारी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी रुग्णालयात येऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ किरणकुमार वाघमारे यांना सुनावले घटना दि 26 रोजी दुपारी पाच वाजता घडली आहे.                                              ग्रामीण रुग्णालयात शासनाकडून आयोजित सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात खासदार नागेश पाटील आष्टीकर आमदार भीमराव केराम यांचे सह अनेक पक्षाचे पदाधिकारी पत्रकार आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव केराम नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे सह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रण होते परंतु कार्यक्रम सुरू झाल्यानंतर शिवसेनेच्या एकही पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावले गेले नसल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे तालुकाप्रमुख जितू चोले उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सहकार्यकर्ते संतप्त झाले सदरील घटना ज्योतिबा दादा खराटे यांच्या कानी पडतात त्यांनी भर कार्यक्रमातच येऊन राडा घालत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांना जाब विचारला यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा खराटे यांनी कुठलीही अनुचित घटना घडू दिली नाही त्यानंतर मात्र दुपारी पाच वाजता खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे आगमन होताच त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालय गाठून वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यांना सुनावले यानंतर रुग्ण कल्याण समिती सह इतर कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची लुडबुड ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारात सहन करून घेतली जाणार नाही अन्यथा याचे परिणाम गंभीर होतील असे ठणकावून सांगितले यावेळी जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि तालुका अध्यक्ष जितू चोले उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांचे सह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!