ताज्या बातम्यानांदेड

भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य  ; पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे प्रतिपादन.

भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेलाच प्राधान्य  ; पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे प्रतिपादन.

श्रीक्षेत्र माहूर  : जयकुमार अडकिने

माहूर गडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त लाखोच्या संख्येने भावीक पाच दिवसात श्री रेणुका मातेसह गडावरील सर्व देवस्थानचे दर्शन करून गेले असून भाविक जात असलेल्या प्रत्येक ठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त लावल्याने यात्रा काळात एकही अपघात पाकीटमारी किंवा छेडछाडीची घटना आजपर्यंत घडलेली नसल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या उत्कृष्ट नियोजनाचे कौतुक होत असून भाविकांच्या सुविधेसह सुरक्षेला प्रधान्य देत असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक गणेश कराळे यांनी यावेळी केले.                                                             दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माहूर गडावर श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे गडावर लिफ्ट आणि स्कायवाकचे काम सुरू असल्याने मंदिरात जाणाऱ्या पायऱ्यावर दुहेरी वाहतुकीच्या ऐवजी एकेरी वाहतूक करून भाविकांना परतीचा मार्ग म्हणून श्री परशुराम मंदिरा कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डिके भिसे यांनी दोनच दिवसात नवीन पायऱ्या बनवून विक्रम केल्याने या पायऱ्या द्वारे भाविक सहजरित्या गडावरून खाली उतरत आपापल्या घरी आनंदात मार्गस्थ होत असल्याने तसेच प्रत्येक पाच पायरीवर पोलीस बंदोबस्त लावला गेल्याने भाविकांचे दर्शन आनंदात होत असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाचेही कौतुक होत आहे.                                                   पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांचे सह बिलोली देगलूर नांदेड ग्रामीण धर्माबाद भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच 8 पोलीस निरीक्षक 29 सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक तसेच पोना पोहेका पोका 320 महिला पोहेका पोका 79 तसेच पुरुष होमगार्ड 254 महिला होमगार्ड 114 असा एकूण 800 च्या जवळपास पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने भाविकांचे दर्शन सुखकर होत आहे.       पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना संपूर्ण सुविधा मिळाव्यात सुरक्षा मिळावी या हेतूने विदर्भातील धनोडा मराठवाड्यातील केरोळी मध्ये असलेल्या पैनगंगा नदीवरही बंदोबस्त लावला असून येथून केरोळी फाटा ईदगाह बालाजी मंगलम मातृ तीर्थ सह्याद्री टी पॉइंट वसंतराव नाईक चौक स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व्ही पॉईंट बस स्थानक देवेश्वर मंदिर तलाव छत्रपती शिवाजी महाराज चौक जामा मस्जिद नगीना मज्जिद गौसिया मस्जिद मदिना मस्जिद भगवान गौतम बुद्ध पुतळा सोनापीर दर्गाह ग्रामीण रुग्णालय कॉलेज श्री गणेश मंदिर उजले पीर वसमतकर महाराज मठ श्री चंडिका देवी मंदिर गायमुख परशुराम मंदिर व्हीआयपी पार्किंग देवी कमान देवी दुकाने दर्शन मार्ग महाकाली मंदिर किल्ला यासह श्री दत्त शिखर संस्थान श्री अनुसया माता संस्थान कैलास टेकडी सह कैलास टेकडीचा रस्ता अनुसया मातेचा रस्ता श्री रेणुका देवी संस्थान वरील सर्व पायऱ्या परशुराम मंदिरावरील सर्व पायऱ्या या सह घाटातील अनेक ठिकाणी प्रचंड मोठा तगडा बंदोबस्त लावल्याने भाविकांना रात्रीही बिनधास्तपणे दर्शन घेता येत असून गडावर जाणारी वाहने पूर्णपणे बंद करण्यात आल्याने ट्राफिक जाम च्या समस्येतूनही सुटका झालेली आहे आलेले सर्व भाविक आपली वाहने पार्किंग मध्ये लावून एसटी बस द्वारेच प्रवास करत असल्याने शिस्त आणि सुरक्षेचा अनोखा संगम यावेळी भाविकांना पहावयास मिळत असल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे माहूर करा सह भाविकातूनही अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!