ताज्या बातम्यानांदेडनायगाव

दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्या – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

नायगाव:- बाळासाहेब पांडे

नांदेड जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि दुबार पेरणीच्या संकटामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली मोठा शेतकरी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

या निवेदनात दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टर १ लाख रुपयांची तातडीची मदत, 23-24 व 24-25 वर्षांतील खरीप-रब्बी पिक विमा रक्कम तात्काळ वाटप, संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल व पाणीपट्टी माफी, तसेच शेतकऱ्यांना 50 हजार रुपये थेट खात्यावर जमा करावेत अशा विविध अतिमहत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या.

नांदेड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा  दुबार पेरणीसाठी प्रति हेक्टर ₹1,00,000 मदत द्यावी

 

सन 2023-24 व 2024-25 चा पिक विमा त्वरित वितरित करावा  शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व वीजबिल माफ करावे   रब्बी पिक विमा 100% मंजूर करावा

 

युपीपी/विष्णुपुरी/बारुळ/मन्याड/लिंबोटी मध्यम प्रकल्पांतून पाणी सोडावे

विमा हप्त्याऐवजी थेट खात्यात 50,000 रुपये प्रती हेक्टर दिले जावेत.

एमएसपी लागू करून शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा  बियाणे, औषधे, ट्रॅक्टर, सिंचन साधने आदींवरील GST रद्द करावारकारी खरेदी केंद्रे सुरू करावीत

 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे   शेतकऱ्यांचे इशारे – अन्यथा आंदोलन अटळ

या मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषण, मोर्चे आणि आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे जगणे अवघड झाले असून, शासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, असे मत शिष्टमंडळाने व्यक्त केले.

गजानन पा. चव्हाण, गोविंदराव पा. सिंधीकर, डॉ. भगवान पा. मनोरकर, राजू पा. बोळशेकर, माधव शिंदे, गजानन तमलूरे, बालाजी सूर्यवंशी, मधुकर शिंदे, मारुती शिंदे, नानाराव शिंदे, व्यंकटराव कवळे, बाबुराव कुदळेकर, गोविंद शिंदे, संजय भोसेकर, सिद्राम हाळे, बालाजी ढगे, पंजाबराव रहाटेकर, विजय कदम, विठ्ठल बोरीकर, साईनाथ इबितवार, मुजाहिद पठाण आणि असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!