
नायगाव :
तालुक्यातील कुंटुर येथील कुंटूरकर शुगर अॅण्ड अॅग्रो प्रा. लि. या साखर कारखान्याच्या २०२५-२०२६ च्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर दुपारी एक वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन कोल्हापूर येथील प्रसिद्ध उद्योजक करण कृष्णात पाटील व सौ. शगुन करण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन राजेश गंगाधरराव देशमुख कुंदुरकर यांनी शेतकरी, ऊस उत्पादक आणि कारखान्यातील सर्व कामगार यांचे कारखान्याच्या प्रगतीसाठी असलेले योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले, आगामी हंगामात जास्तीत जास्त ऊस गाळप होऊन गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळाले पाहिजे. यासाठी शेतकी व तांत्रिक विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ऊस लागवड वाढवण्यासाठी मी स्वतः १५० गावांना भेट देणार असून ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत शेतकऱ्यांनी लागवडीवर भर द्यावा. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर गणपत काळे यांनी प्रास्ताविक केले. सोहळ्याला सूर्याजी पाटील चाडकर, सूर्यकांत पाटील कुंदुरकर, डॉ. सुनील पाटील कदम, भाऊसाहेब देशमुख रूईकर, अॅड. ज्ञानेश्वर मोरे, मारोतराव पाटील कदम कुंदुरकर, नीलेश देशमुख रूईकर, शेषेराव पाटील बळेगावकर, हणमंतराव पाटील कोळगावकर, परबतराव जाधव कृष्णुरकर, गजानन जुने कोकलेगावकर, शिवाजीराव देशमुख रूईकर, संजय आनेराय शेळगांवकर, बाबासाहेब हंबर्डे हुस्सेकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंद जाधव, शंकर पांचाळ, योगेश पतंगे, पुंडलिक कदम, नितीन देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

