
नायगाव
नायगाव तालुक्यातील आंतरगाव जिल्हा परिषद शाळेत एक हळवा आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या मनातील लाडका, सेवाभावी आणि गुणी शिक्षक म्हणून नाव कमावलेले किशन पचलिंग सर यांना त्यांच्या स्थानांतरणानिमित्त शाळेतील चिमुकल्यांनी अश्रूंनी निरोप दिला. बरबडा येथील गरिब-गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नेहमी तत्पर राहणारे, सामाजिक जाण असलेले आणि शिक्षणातून जीवनमूल्यांची शिकवण देणारे पचलिंग सर आता उमरी तालुक्यातील कौडगाव शाळेत नवीन कार्यभार स्वीकारणार आहेत. निरोप समारंभाच्या वेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात वातावरण भावनांनी ओथंबून गेले होते. अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांच्या डोळ्यात पाणी तरळले होते, कारण “सर” म्हणजे फक्त शिक्षक नव्हते — ते मुलांचे मार्गदर्शक, मित्र आणि प्रेरणास्थान होते. शिक्षणक्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी केलेली किमयाच आज त्यांच्या साठी सार्थकी ठरली आहे…..

