
नायगाव
देश सेवेचे पवित्र कार्य करणारा प्रत्येक सैनिक हा आपणा सर्व भारतीयांसाठी स्वाभिमान असून कमी वया मध्ये देशसेवा करण्याचा निर्णय साईनाथ यांनी घेतला .हा निर्णय घेणारा प्रत्येक युवक हा आपणा सर्वासाठी गर्वाची बाब आहे.म्हणून गावकऱ्यांनी आयोजित केलेला सत्कार हा देश सेवा करताना सैनीकांसाठी स्फुरण व स्फूर्ती देणारा ठरणारआहे असे विचार शिवराज पाटील होटाळकर माजी शिक्षण सभापती यांनी काढले.
इंडियन आर्मी मध्ये दाखल होऊन सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गावी आलेल्या नायगाव तालुक्यातील पळसगाव येथील साईनाथ उपासे या युवकाचे गावकऱ्यांनी सोमवार दि. (०९) रोजी जोरदार स्वागत केले.या प्रसंगी ते बोलत होते.
आपल्या जन्मभूमीत परत आलेल्या भारतीय जवान श्री साईनाथ गुलाबराव पा. उपासे या सैनिकाचा सन्मान अनेक मान्यवरांसह उपस्थितीत गावकऱ्यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी विचार पिठावर श्री संत बालयोगी गंगाबन गुरु मंगलबन महाराज यासह जि.प.चे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती नायगाव येथील माजी सभापती श्रीनिवास पाटील चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बालाजी बचेवार, माजी सैनिक तुपदाळे, संभाजी कांबळे, यलप्पा शिरोळे, ताकबीड येथील माजी सरपंच शिवराज पाटील वरवटे, अंतरगाव येथील माजी सरपंच संभाजी पाटील, गंगनबीड येथील माजी
सरपंच गंगाधर पाटील मोरे, पळसगाव येथील सरपंच सौ. यशोदाबाई साहेबराव कांबळे, टाकळगावचे चेअरमन मदनराव पा ताटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय जवान साईनाथ उपासे यांचे गावात आगमन झाल्यानंतर समस्त गावकऱ्यांनी गावभर त्यांची भव्य रॅली काढून जंगी स्वागत करून फटाक्याची अतिश बाजी केली तर अनेक आया भगीनीनी त्यांना औक्षण केले, भारत माता की जय वंदे मातरम घोषणा सर्वत्र दुमदुमली, प्रारंभी प्रस्ताविक पर माजी सरपंच शिवाजी पाटील शिंदे यांनी आपली भूमिका मांडली कार्यक्रमांचे सूत्रसंचलन पत्रकार माधव बैलकवाड यांनी तर आभार पोलीस पाटील संतोष सूर्यवंशी यांनी मानले.
यावेळी उपसरपंच दत्ता पाटील शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष कडाजी पाटील शिंदे, चेअरमन दशरथ पाटील उपासे, (पत्रकार) अरविंद पा. शिंदे, बाबुराव पाटील उपासे, माधवराव पाटील उपासे, रामकिसन पाटील उपासे, गुलाबराव पाटील उपासे, माधव पाटील उपासे, नामदेव पाटील उपासे यासह गावातील महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

