ताज्या बातम्यानांदेड

माहूर येथे संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सहात साजरी !.

तेली समाज संघटनेची माहूर तालुका कार्यकारिणी गठीत ; तालुकाध्यक्ष पदी कांतराव घोडेकर यांची निवड.

.

माहुर : राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांचे प्रमुख सहकारी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य दि.०८ रोजी माहूर येथील कपिलेश्वर धर्मशाळेत जयंती निमित्य किनवट माहूर तालुक्यातील तेली समाज संघटनेच्या वतीने अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे अध्यक्ष जेष्ठ कार्यकर्ते नारायण सुर्वे तर प्रमुख पाहुणे जेष्ठ समाजिक कार्यकर्ते अनिल वाघमारे, ह.भ.प. गंगाधर उर्फ शारदासुत खामनकर महाराज पत्रकार इलियास बावानी, सुरेखा तळणकर हे होते. संपन्न झालेल्या सोहळ्यात संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. ह.भ.प. गंगाधर उर्फ शारदासुत खामनकर महाराज, पत्रकार जयकुमार अडकीने, नारायण सुर्वे यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनचरित्र मनोगतात सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जेष्ठ कार्यकर्ते नागोराव सुर्वे यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

अभिवादन कार्यक्रमानंतर त्याच ठीकांणी तेली समाज संघटनेची बैठक संपन्न झाली व त्या मध्ये पुढील कार्यकाळाकरिता माहूर तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये तालुकाध्यक्षपदी-कांतराव घोडेकर, उपाध्यक्षपदी-निलेश वाघमारे, सचिवपदी- नागोराव सुर्वे, कोषाध्यक्षपदी – किरण क्षीरसागर ता.संघटकपदी रुपेश जाधव, सहसचिवपदी संजय सुरोशे, ता. कार्यकारिणी सदस्यपदी दिनकरराव क्षीरसागर, प्रभाकर क्षीरसागर, ता.कार्यकारिणी महिला सदस्यपदी सौ. पृथ्वी अरुण घोडेकर, सौ. कविता निलेश पाटील यांची निवड करून समाज संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली. यावेळी ज्ञानेश्वर क्षीरसागर, मनोहर क्षीरसागर, सुधाकर नाटकर, सागर क्षीरसागर, अनिल क्षीरसागर, निलेश पाटील, राजहंस तायडे, अरुण घोडेकर, सचिन क्षीरसागर स्वपनील क्षीरसागर, योगेश करडेकर, दत्ता तायडे आदीसह समाजबांधव उपस्थित होते. नव्याने गठीत करण्यात आलेल्या समितीचा सत्कार करून पदभार देण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!