ताज्या बातम्यानांदेडनायगाव

गोदावरी नदीच्या बॅक वॉटर मुळे कुंटूर परिसरातील जमीन पुन्हा पाण्याखाली कूंटूर उमरी रस्ता बंद.

कुंटूर वार्ताहर

नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गोदावरी नदी मौजे बळेगाव सातेगाव, इजली, धनंज ,सांगवी, हुस्सा राहेर ,ह्या परिसरातील गावाला परिसरातून जाणारी गोदावरी नदी तुडुंब भरून वाहत असून गोदावरी नदीचा बॅक वॉटर सर्वत्र पसरले असून त्याचा फटका कुंटूर कोकलेगाव परिसरातील ही नागरिकांना सहन करावा लागत आहे . त्यामुळे गोदावरी नदीच्या पूर्ण बॅक वॉटर मुळे वापस आल्याने नदी शेतातील नदी नाले तुडुंब भरले असून शेतात सोयाबीनच्या पिकामध्ये पाण्याचा पूर येऊन सडून गेले आहेत. त्यातच दोन दिवसापासून संत धार चालू होती . गोदावरी नदीच्या पॅक वॉटर मुळे पुन्हा रस्ते बंद. उमरी कुंटूर नायगाव कडे जाणारा रस्त्यावर चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. त्यातच कोकलेगाव नायगाव कडे जाणारा रस्त्यावरही पाणी सासल्याने दोन्ही रस्ते बंद झाले आहेत . सध्या कुंटूर परिसरात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. त्यातच पिकाची नासाडी झाली असून सर्व पीक हे पाणी धरू लागले आहेत . त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला मात्र निधी किती व कितीही नूस्कान याची आजही तपासणी सुरूच असल्याची माहिती तलाठी धिकाऱ्यामार्फत होत आहे. त्यामुळे कुंटूर परिसरातील 23 गावांमध्ये पावसाचा कहर झाल्याने कूंटूर मंडळ मात्र खरडून निघाले असल्याची माहिती शेतकऱ्याकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पावसाच्या बॅकवॉटरमुळे पुन्हा जमिनीत पाणी साचले असून रब्बी पिकाला याचा धोका निर्माण होणार असल्याची माहिती शेतकऱ्याकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!