ताज्या बातम्यानांदेड

१ जुलै रोजी माहूर तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत !.

आजी माजी लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी उपस्थित राहावे- तहसीलदार मुगाजी काकडे यांचे आवाहन.

माहुर:- जयकुमार अडकिने

माहूर- जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अधिसूचनेनुसार सन २०२५-३० या कालावधी करिता माहूर तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील सरपंच पदाचे आरक्षण दि.०१ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती माहूरच्या वसंतराव नाईक सभागृहात काढण्यात येणार आहे. तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि स्त्रिया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत ( सरपंच व उपसरपंच ) निवडणूक नियम १९६४ च्या नियम २ अ (२) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी पुढील प्रमाणे तपशील अधिसूचित करून दिला आहे. अनुसूचित जाती राखीव १ पद, त्यापैकी महिला राखीव १, अनुसूचित जमाती राखीव १ त्यापैकी महिला राखीव १, नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ६ त्यापैकी महिला राखीव ३, खुला प्रवर्ग १३ त्यापैकी महिला राखीव ७ असे आरक्षण राहणार आहे. आरक्षण सोडतीस माजी जि.प./पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच व ग्रा.प. सदस्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार मुगाजी काकडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!