ताज्या बातम्यानांदेडनायगाव

म. रा.प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी हसगुळे, तर सरचिटणीस पदी घुमलवाड .

नायगाव( बाळासाहेब पांडे)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष पदी नायगाव चे रहिवासी शंकर हसगुळे,तर सरचिटणीस पदी नायगाव तालुक्यातील नावंदी शाळेचे सह शिक्षक रमेश घुमलवाड यांची निवड करण्यात आली या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हास्तरीय महामंडळ सभा शुक्रवारी 18 एप्रिल रोजी हॉटेल ताज येथे संपन्न झाले सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष केशवराव जाधव होते या सभेत महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सल्लागार पदी निळकंठ चोंडे यांची तर राज्य उपाध्यक्षपदी व्यंकटराव कल्याणपाड सर यांची निवड करण्यात आली तर नांदेड नूतनचे जिल्हा अध्यक्ष शंकर हासगुळे नांदेड सरचिटणीस पदी रमेश घुमलवाड तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संग्राम झुडपे सर यांची निवड करण्यात आली राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्याविषयी आणि संघटनेचे कार्य संघाचा इतिहास शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरीय संघटनचे करायची कामे याशिवाय राज्यनेते माधवराव पाटील राज्य सरचिटणीस लायक पटेल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील 35 उपक्रम शील शिक्षकाचा वाडी तांड्यावर त्यांनी जीव ओतून जिल्हा परिषद शाळेचा विकास केला अशा उपक्रमशील शिक्षकांचा त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला बोरगावकर यांनी शिक्षकांना मार्गदर्शक तत्त्वे व मूलभूत हक्का विषयी सखोल असे मार्गदर्शन केले या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तावित निळकंठ चोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन शंकर हासगुळे यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!