
नायगाव
घुंगराळा येथील ग्रामपंचायत कार्यालयात पंचायत समिती कार्यालय, नायगाव(खै) च्या वतीने एक दिवस गावकऱ्यांसोबत ग्रामदरबार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. रुक्मिणीबाई पांचाळ या होत्या तर या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी (पंचायत) कापसे मॅडम, जिल्हापशुसंवर्धन अधिकारी श्री .गिरी ,नायगाव पंचायत समितीचे पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी श्री. टोणगे ,कृषी विस्तार अधिकारी श्री. शिंदे ,आरोग्य विस्तार अधिकारी* *मुखेडकर ,जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता श्री.नाचरे ,घरकुल अभियंता जाधव , अंगणवाडी* *पर्यवेक्षीका कमठेवाड तालुका आरोग्य अधिकारी श्री.खिल्लारे ,तलाठी मोरे ,कृषी सहाय्यक श्री. शिंदे ,महावितरण चे अभियंता श्री.स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी यांनी त्यांच्या खात्याअंतर्गत येणाऱ्या सर्व योजणांची माहिती गावकऱ्यांना सांगितली .याबरोबरच पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी जलजीवन मिशनच्या कामाबद्दल,कामात येणाऱ्या अडचणींबद्दल माहिती देऊन लवकरच ही कामे पूर्ण करू याबाबत सांगितले. तसेच उपस्थित सर्व अधिकारी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन करूण गावकऱ्यांच्या अडीअडचणी, समस्या जाणून घेत सर्व अडीअडचणी ,समस्या लवकरात लवकर सोडवून प्रलंबित असलेली कामे लवकरच मार्गी लावू याबाबत गावकऱ्यांना आश्वास्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच वसंत सुगावे पाटील यांनी केले. प्रास्ताविकात वसंत सुगावे पाटील यांनी गावातील चालू असलेल्या व प्रलंबित असलेल्या कामांबद्दल माहिती देत गावातील कामांचा आढावा प्रास्ताविकातून सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी श्री. शिंदे यांनी केले तर आभार सेवानिवृत्त विस्तार अधिकारी नागोराव दंडेवाड यांनी मानले.गावातील नागरीक, शेतकरी, महिला, युवक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

