ताज्या बातम्यानांदेडनायगाव

अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनात  ; लहूजी शक्ती सेनेचे तहसीलदार माहूर यांचे मार्फत सदस्य सचिव बार्टी यांना निवेदन.

माहूर- अनुसूचित जाती (SC) आरक्षणाच्या उपवर्गीकरणास लहूजी शक्ती सेनेने समर्थन दिले असून माहूर शाखेच्या वतीने सदस्य सचिव तथा महासंचालक,बार्टी (BARTI) / सामाजिक न्याय विभाग,महाराष्ट्र शासन,मंत्रालय, मुंबई यांना तहसीलदार माहूर यांचे तर्फे निवेदन पाठविण्यात आले आहे. .      सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यात एससी आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे, त्या अनुषंगाने आरक्षणाचा समन्यायी लाभ: अनुसूचित जाती प्रवर्गात ५९ पेक्षा जास्त पोटजातींचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही दशकांत आरक्षणाचा मोठा हिस्सा ठराविक जातींनाच मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अनेक अति-मागास जाती विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिल्या आहेत,

उपवर्गीकरणाची अंमलबजावणी: सर्व घटकांना समान संधी मिळण्यासाठी SC प्रवर्गाचे वर्गीकरण (उदा. A, B, C, D) करून, आरक्षणाची टक्केवारी त्या-त्या जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणात विभागून देण्यात यावी.

न्याय्य हक्क: अति-मागास आणि अल्पसंख्याक जातींना सरकारी नोकऱ्या आणि उच्च शिक्षणात उचित वाटा मिळण्यासाठी या उपवर्गीकरणाची अत्यंत गरज आहे. त्यामुळे शासनाने गठीत केलेल्या समितीने या बाबींचा गांभीर्याने विचार करून SC उपवर्गीकरणाच्या बाजूने निर्णय घ्यावा अशी मागणी सदर निवेदनात केली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष देवानंद भांडवले, शिवाजी जोगदंडे, अतुल खानजोडे, मिलिंद चांदणे, दत्ता आठवले, अतिश काळे, सतीश उमाप, शेकन्ना गुंडावार,गणपत मस्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!