ताज्या बातम्यानांदेड

माहूर तहसील कार्यालयात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध.

श्रीक्षेत्र माहूर

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक वाहन इ व्ही चार्जिंग स्टेशन उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत माहूर तहसील कार्यालय येथेही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या सुविधेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग करणे सुलभ होणार आहे. तसेच विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली आहे

माहूर हे राज्यातील एक महत्त्वाचे धार्मिक व पर्यटनस्थळ असून, श्री रेणुकामाता देवी दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येथे येत असतात. वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराच्या पार्श्वभूमीवर माहूर येथे उपलब्ध होणारी ही सुविधा भाविक व पर्यटकांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटन सुविधांमध्येही भर पडणार आहे.                        सध्या पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती तसेच जागतिक स्तरावरील विविध घडामोडी व युद्धजन्य परिस्थितीमुळे ऊर्जा सुरक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी चार्जिंग सुविधांचे जाळे उभारणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, त्या दृष्टीने माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची ही संकल्पना अभिनंदनीय व दूरदर्शी आहे.

या उपक्रमामुळे हरित ऊर्जा, प्रदूषणमुक्त वाहतूक व्यवस्था आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना चालना मिळणार असून, जिल्हा प्रशासनाच्या पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!