ताज्या बातम्यानांदेड

लांजी येथे महाराष्ट्राचे स्वच्छतादूत द.भ.प. साईनाथ महाराज यांनी राबविले स्वच्छता अभियान.

वनराई बंधारचे जल पूजन करून प्रवचन !.

जयकुमार अडकिने

माहूर- दत्तजयंती चे औचित्य साधून दतजन्माच्या आधीच्या दिवशी महाराष्ट्राचे स्वच्छतादूत तथा आनंद दत्तधाम आश्रम माहूरचे मठाधीश द.भ.प. साईनाथ महाराज यांच्या हस्ते दि.०२ डिसेंबर २०२५ रोजी कृषी विभागाचे वतीने करण्यात आलेल्या वनराई बंधाराचे जल पूजन करण्यात आले तसेच मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी योजने अंतर्गत मौजे लांजी येथे स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचे महत्व प्रवचनातून पटवून देत जनजागृती केली, यावेळी प्लास्टिक मुक्त गाव, डास मुक्त गाव स्वच्छ व समृद्ध गाव होऊन गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ग्रामपंचायतला सहकार्य करावे असे आवाहन देखील केले. सरपंच मारोती रेकुलवार यांनी शासनाच्या विविध योजनेतून लांजी ग्रामपंचायतमध्ये करण्यात आलेल्या विकास कामाचा लेखा जोखा सादर केला व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या योजना बाबत सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री पंचायत राज समृद्धी योजनेत ग्रामपंचायतला पारितोषिक मिळवण्यासाठी नागरिकांनी ग्रामपंचायतला सर्वतोपरी सहकार्य करावे मिळालेल्या पारितोषिकाच्या रक्कमेतून गावासाठी इतर आवश्यक ती विकास कामे करता येतील असे निक्षून सांगितले. देवा दत्ता दत्ता च्या गजरात आनंद दत्त धाम आश्रमाच्या भक्तमंडळीनी आश्रम ते लांजी पदयात्रा काढून संपूर्ण लांजी गावात स्वच्छता केली.

यावेळी मालवाडा येथे पदयात्रेसह जाऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा केले. लिंबायत नेर येथील भक्तांनी पद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले.तसेच यामध्ये लांजी जि.प. प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी जवाहरलाल जयस्वाल, अ.भा.मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य जेष्ठ पत्रकार जयकुमार अडकीने, आश्रमाचे बालाजी पाटील पुनेगावकर, विलास पाटील रोहीपिंपळगावकर, नत्थू पाटील, ग्रामपंचायत अधिकारी साधना तावडे, कृषी सहाय्यक सुधीर राजूरकर, जि.प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक अरविंद जाधव, पत्रकार तथा छायाचित्रकार बालाजी कोंडे,निळकंठ पाटील, ग्रामपंचायत चे उपसरपंच व सर्व सदस्य तथा नागरिक बहुसंख्य उपस्थित होते. एस.एस.पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच मारोती रेकुलवार यांनी गावातील नागरिकांना त्यांच्या कडील विविध भोजन कार्यक्रम प्रसंगासाठी ग्रामपंचायत मार्फत विनामुल्य २ हजार भोजन ताट उपलब्ध करून करून देण्यात येतील तसेच चहा पान कार्यक्रमास सुद्धा ५०० स्टील कप उपलब्ध करून करून देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रगीत व दत्ताच्या आरतीने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!