
नायगाव/नागेश कल्याण
होऊ घातलेल्या आगामी काळातील स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद, निवडणुकां संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक मुखेड ये करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी दिली आहे.
सदर आढावा बैठक ही लोहा-कंधार मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर महानगराध्यक्ष आ ओमप्रकाश पोकर्णा,मा.आ अविनाश घाटे, मा.आ सुभाष साबणे,मा.आ मोहन अण्णा हंबर्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर,प्रदेश सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी,प्रदेश सरचिटणीस वसंतराव सुगावे,प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब देशमुख गोरठेकर,प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख,हे मान्यवर नेते मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.या आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, व नगरपरिषद, इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे

