नायगाव
मराठा आरक्षणाचे प्रणेते आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या “चलो मुंबई” आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाज एकजुटीने सज्ज झाला आहे. श्री क्षेत्र महादेव मंदिर, गंगनबीड येथे झालेल्या तालुकास्तरीय बैठकीत मुंबईवारीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आणि शासनाला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.
बैठकीतील ठळक मुद्दे ; मनोज दादांचा शब्द अंतिम आदेश पालनासाठी बांधव सज्ज ; आरक्षण तात्काळ मंजूर करा ; अन्यथा भगवे वादळ रोखणे अशक्य मुंबई अर्थव्यवस्था ठप्प होईल ; शासनावर संपूर्ण जबाबदारी.
गावागावातून वाहन व्यवस्था, मुक्काम, भोजन याची तयारी पूर्ण. सरकारला कडक इशारा
“मनोज दादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आम्ही पूर्ण सज्ज आहोत,” असा निर्धार उपस्थितांनी बैठकीत व्यक्त केला.बैठकीत सरकारविरोधात स्पष्ट भूमिका घेण्यात आली
“मराठा समाजाचे आरक्षण तात्काळ मंजूर करा. जर हे भगवे वादळ मुंबईत दाखल झाले, तर देशाची आर्थिक राजधानी खिळखिळी होईल. याची जबाबदारी शासनाचीच असेल.”
मुंबईवारीसाठी तयारीत नायगाव तालुका गावागावातून मोठ्या संख्येने बांधव व स्वयंसेवक आंदोलनात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. वाहनव्यवस्था, मुक्काम, भोजन आणि मार्गातील संपर्क यावर सविस्तर नियोजन बैठकीत करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, नायगाव तालुक्यासह राज्यभरातून मुंबईकडे निघणाऱ्या भगव्या लाटेला अडवणे अशक्य होईल, हे स्पष्ट झाले आहे.

