
लालसिंग रानडे
नायगाव बाजार :- महावितरणच निष्काळजीपणामुळे नायगाव तालुक्यातील गडगा येथील कृषी पंपाचा विधुत पुरवठा मागील सात महिन्यापासून बंद असून.शेतकऱ्यांच्या विहिरीतील मोटारी बंद आहेत.पिण्याचा पाण्याचा व शेतीसाठीच्या सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जनावरांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.या अतिशय गंभीर मुद्द्याकडे जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते.
येथील डिपी गेल्या सात महिन्यापासून बंद अवस्थेत असून.महावितरणाचे जबाबदार अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करित असून. शेतकऱ्यांनी रब्बी पिके घेण्यासाठी शेतीची मशागत करून ठेवली.मात्र संबधिताकडून विजेचा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त किंवा नविन बसून दिला जात नाही.यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा तक्रारी केल्या.
मात्र महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून फक्त आश्वासन दिले जाते.आमच्या हातात काही नाही.रिपोर्ट् पाठवला आहे.देगलूर येथून डिपी आल्याच्या नंतर बसून देवू असे मागील सात महिन्यापासून उत्तर देत आहेत.या बाबींकडे महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सदरिल समस्या सोडवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे.विजे आभावी जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शेतकरी व पशुधनासाठी मोठं संकट आहे.महावितरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत.

