
नायगाव
बिलवणीकर यांनी संस्थेच्या प्रगतीच्या दृष्टीने केलेले काम हे अविस्मरणीय असून त्यांच्या कार्याचा सुगंध नेहमी दरवळत राहणार असून,एज्युकेशन सोसायटीच्या अनेक युनिट मध्ये जी वाढ झाली त्या मध्ये प्रशांत सर यांचा वाटा महत्वाचा आहे असे प्रतिपादन खा.प्रा रवींद्र चव्हाण यांनी बिलवणिककर यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना केले.
नायगाव शरदचंद्र महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत बिलवणीकर यांच्या सेवा निवृत्तीबद्दल निरोप समारंभ कार्यक्रम महाविद्याल याच्यावतीने घेण्यात आला. या वेळी त्यांचा सपत्नीक सत्कार संस्थेचे अध्यक्ष खा. रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. अतिशय भावनिक असलेल्या सेवानिवृत्ती समारंभात खासदार चव्हाण यांनी प्रशांत बिलवनीकर यांच्या ३६ वर्षाच्या सेवा काळातील कार्याचा गौरव करत नायगाव एज्युकेशन सोसायटीच्या विविध शैक्षणिक शाखा निर्माण करण्यामागे त्यांचे मोठे योगदान असल्याचे गौरव उद्गार काढले.
या निरोप संभारभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माधवराव आपा बेळगे हे होते.ज्येष्ठ संचालक केशवराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, विजय चव्हाण, माजी प्राचार्य तथा कोशाध्यक्ष गोविंद मेथे,प्राचार्य रमेश लव्हेकर,माजी प्राचार्य बी. डी. इंगळे, श्रीरंग वटमवार,बी. जी.गायकवाड,ढेबरे, पाणपटे,नांगरे,हणमंत पा सुजलेगावकर,कदम, श्रीधर चव्हाण प्राचार्य के जी सूर्यवंशी,प्राचार्य के हरिबाबू,प्रदीप बिलवणीकर,यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. यावेळी संस्थेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या निरोप संभारभात प्रा. डॉ.बलभीम वाघमारे,बाळासाहेब पांडे, दत्ता मामा येवते,हरिबाबू,श्री व सौ बिलवणीकर,या सह अनेक मान्यवंराची भाषणे झाली.
या कार्यक्रमास संजय चव्हाण,पंढरी भालेराव,रवींद्र भालेराव,प्रा. गडमवार, शरद कुलकर्णी,दत्ता येवते, श्रीराम चव्हाण ,श्याम कुलकर्णी,सह शहरातील बिलवणीकर चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता……कार्यक्रमाचे सुरेख सूत्र संचलन प्रा. परडे सर यांनी तर आभार प्रा वाघमारे यांनी मानले.

