
नांदेड- जयकुमार अडकीने
सध्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची पेरणी शेतात केली असून पाण्याअभावी पिके सुकून चालली आहेत. कयाधू शाखेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना इसापूर धरणाचे पाणी कयाधू शाखा कालव्यातून त्वरित सोडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर यांनी कार्यकारी अभियंता श्री. जगताप यांच्याकडे केली आहे.
कयाधू शाखा कालव्याअंतर्गत धोतरा, रावणगाव, धानोरा, वाळकी, शिवणी, आष्टी, बोरगाव, वटफळी, लिंगापूर, कामारी, वाघी, टेंभुर्णी, दिघी या गावातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीला इसापूर धरणाच्या पाण्याचा फायदा होतो. धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये इसापूर धरणाचे पाणी रब्बीसाठी पाळ्या सोडण्याचे ठरले आहे,पहिली पाळी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्वच लाभक्षेत्रात सोडण्यात येणार अस सांगण्यात आले,परंतु डिसेंबरचा दुसरा आठवडा उलटूनही इसापूर धरणाचे पाणी कयाधू शाखा कालव्यामध्ये सोडले नाही, शेतकऱ्यांनी शेतामध्ये हरभरा, गहू, ऊस व इतर रब्बी पिकांची धरणाचे पाणी येईल या आशेवर पेरणी केली असून त्वरित कयाधूच्या शाखा कालव्यात धरणाचे पाणी सोडावे याबाबत कार्यकारी अभियंता श्री.जगताप यांच्याकडे भाजपचे तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी मागणी केली आहे.
या मागणीवर धोतरा येथील माधवराव सुर्यवंशी, प्रकाश सूर्यवंशी मंचक वानखेडे, माधव वानखेडे, अविनाश सूर्यवंशी,रावणगावचे उपसरपंच बापुदास देशमुख, मंगेश धात्रक, टाकळा येथील नागेश कोल्हे, साईनाथ पाटील कोल्हे,धानोराचे उपसरपंच देवानंद वानखेडे, संजय वारकड गजानन माने,वाळकी बाजारचे भगवान कदम,सुनील कदम,अनिल लक्षटवाड,अरुण गायकवाड वाळकी बुद्रुक भीमराव चव्हाण राजेंद्र मोरे शिवणीचे विठ्ठलराव वानखेडे, बाबुराव पवार,सुनील ताकतोडे,आष्टीचे बालाजी पा. शिंदे,संतोष कांडले, लिंगापूरचे परसराम पाटील, सुनील पाटील देवसरकर अनिल कवडे,संतोष देवसरकर,विरसणीचे भगवान कदम, दिघीचे पंजाबराव वानखेडे यांची नावे आहेत.

