ताज्या बातम्यानांदेड

महिलांच्या उन्नतीसाठी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी जीवन वेचले. ;  डॉ. राम कदम यांचे प्रतिपादन

श्रीक्षेत्र माहूर  जयकुमार अडकिने

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक यातना भोगून महिलांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले, त्यामुळेच आज महिला सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगत आहेत,असे प्रतिपादन डॉ. राम कदम यांनी केले.येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात दि. 3 जाने. रोजी स. 10 वा. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. कदम बोलत होते.

क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त जयकुमार अडकीने, नंदकुमार जोशी,पद्मा गिऱ्हे,सुरेखा तळणकर, स्वाती आडे व यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.यावेळी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,समता परिषदचे जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे, अ. भा. माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गिऱ्हे, अनिल वाघमारे,आ. भा. माळी महासंघ नांदेडचे जिल्हाध्यक्ष सचिन बेहेरे,संजय राठोड, गोपू महामुने,वसंत कपाटे, विजय आमले, भारती सर,रवी बेहेरे, संजय बनसोड,जयंत गि-हे, इलियास बावाणी,ज्ञानेश्वर चौधरी,अमृत जगताप,अनिल कोरटकर,प्रशांत कदम, विजय तिवसकर,विश्वजित जाधव, डॉ. सत्यम गायकवाड, सिद्धार्थ तामगाडगे, प्रदीप शिरकूरवार, विनोद सूर्यवंशी, संदीप गोरडे,पवन चौहान, कैलास फड, गोपाल चव्हाण,दिलीप गंदेवाड आदींची उपस्तिती होती.प्रसंगाचे औचित्य साधून पाईकराव यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विठ्ठल सोनोने यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!