
माहूर : जयकुमार अडकिने
माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचे 2017 पासूनचे प्रलंबित हप्ते रक्कम तात्काळ खात्यात वर्ग करा, व सदर घरकुल योजनेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोशींविरुद्ध अपरातफरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करा आदी सह विविध मागण्याकरिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माहूर तालुका अध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी दिनांक 27 जानेवारी सायंकाळी चार वाजता बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
माहूर शहरातील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सन 2017 पासूनच्या अनेक लाभार्थ्यानी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहेत. त्या लाभार्थ्यांचीं उर्वरित रक्कम तात्काळ लाभार्थ्यांच्यां बँक खात्यात जमा करा.
सन 2017 पासून आज पर्यंत पैश्या अभावी घरकुल लाभार्थ्यांचें अपूर्ण असलेले बांधकाम करण्यासाठी त्या गोरगरीब लाभार्थ्यांकडून लेखी स्वरूपात हमीपत्र घेऊन त्या त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात उर्वरित असलेली रक्कम तात्काळ जमा करा,
पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांची हक्काची रक्कम लाभार्थ्यांच्यांच खात्यात न टाकता अकोला येथील नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्था अकोला या संस्थेला निधी देण्यात आल्याची व या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, कार्यालयीन अधिक्षक यांच्याकडून दोन कोटी वसूल करून तात्काळ मा.मुख्य अभियंता-3/पा. तथा राज्यस्तरीय अधिकारी, प्रधानमंत्री आवास योजना म्हाडा या कार्यालयाला परत करा म्हणजे घरकुल लाभार्थ्यांच्यां खात्यात लवकर पैसे जमा होतील.

यापूर्वीही अनेक उपोषणे आंदोलने केली परंतु पोकळ व खोटी आश्वासने देण्यापलीकडे काहीही झाले नाही. त्यामुळे व्यथीत होऊन मागणीची पूर्तता होईपर्यंत उपोषण थांबणार नाही असा ठाम निर्धार करून आमरण उपोषण सुरू केले असून आता करेंगे या मरेंगे ची आरपारची लढाई लढत असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष आनंद पाटील तुपदाळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी माहूर शहरातील शेकडो लाभार्थी उपस्थित होते

