नांदेडशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे .

व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी यांचे प्रतिपादन.

श्रीक्षेत्र माहूर :-  जयकुमार अडकीने

विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या विद्यार्थी दशेत शैक्षणिक गुणवत्तेसह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे यासाठी पालकांनीही त्यांना त्या हेतूने दररोज प्रेरणात्मक उपदेश करत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष द्यावे असे प्रतिपादन व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी यांनी माहूरच्या मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे दी 15 रोजी व्हाईस ऑफ मीडियाच्या आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व पालकांचा सत्कार समारोह प्रसंगी केले

माहुर शहरासह तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे व्हॉइस ऑफ मीडियाकडून वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गडावरील आनंदधाम आश्रमाचे राष्ट्रसंत तथा महाराष्ट्र शासनाने स्वच्छता अभियानाचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून नियुक्त केलेले दभप साईनाथ महाराज वसमतकर हे होते तर प्रमुख उपस्थितात व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश जोशी यांची सपत्नीक उपस्थिती होती यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे माहूर तालुका अध्यक्ष विजय आमले मॉडर्न इंग्लिश स्कूलचे संस्थापक अजिज खान सर श्री जगदंबा हायस्कूलचे मुख्याध्यापक विश्वास जाधव यांनी यावेळी प्रस्ताविक व आणि मनोगत व्यक्त केल्यानंतर जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करून दहावी बारावीनंतर काय करावे तसेच पालकांनी विद्यार्थ्यांची आवड निवड लक्षात घेऊन त्यांना पुढील शिक्षणासाठी परावृत्त करत राहावे जेणेकरून त्यांच्या मनात देश सेवा करण्यासाठी अधिकारी बनण्याची स्वप्न उराशी बाळगली जाऊन विद्यार्थीही शैक्षणिक गुणवत्ता वाढवतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दभप साईनाथ महाराज वसमतकर यांनीही विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत मार्गदर्शन केले यावेळी सैनिक स्कूल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने निशांत वट्टमवार कुमारी राणी गुलाबराव माळवे हिची गटविकास अधिकारी म्हणून निवड झाल्याने तिचा विशेष सत्कार करून सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला पत्रकार पद्माताई गिऱ्हे स्वातीताई आडे भाऊ पाटील हडसणीकर यांचे सह ज्येष्ठ पत्रकार वसंतराव कपाटे नंदकुमार जोशी इलियास बावाणी नितेश बनसोडे अपील बेलखोडे फिरोज भाई पठाण संजय बनसोडे जयंत गिऱ्हे गुलाबराव माळवे गोपाल खापर्डे सय्यद किरमानी पुरी महाराज यांचे सह सत्कारमूर्ती विद्यार्थी पालक शिक्षक संस्था चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक सूत्रसंचालन केंद्रप्रमुख एस एस पाटील यांनी केले आभार व्हॉइस ऑफ मीडियाचे माहूर तालुका अध्यक्ष विजय आमले यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!