ताज्या बातम्यानांदेड

अंमली पदार्थांचे व्यसन परिवार व समाजासाठी घातक – पोलीस निरीक्षक गणेश कराड.

माहूर ,

“हौस, मौजमजा किंवा मित्रांच्या आग्रहामुळे अंमली पदार्थांचे सेवन सुरू करणारे युवक आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर घातक परिणाम करून घेतात. परिणामी संपूर्ण कुटुंब आणि समाजव्यवस्थेलाही याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. युवकांनी या व्यसनांपासून दूर राहून खेळ आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे,” असे प्रतिपादन माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले.

ते २६ जून रोजी श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व पोलीस ठाणे, माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाची सुरुवात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील होते. उपप्राचार्या डॉ. महिनाज मुजेवार, उत्तमराव राठोड अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य बाबासाहेब राठोड यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. राजेंद्र लोणे यांनी तर आभारप्रदर्शन क्रीडा संचालक डॉ. धरमसिंग जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन बळीराम पाटील मिशन मांडवीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड आणि सचिव सौ. संध्याताई राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!