ताज्या बातम्याधार्मिकनांदेडनायगाव

महात्मा बसवेश्वर महाराज जयंती नायगावात उत्साहात साजरी.

नायगाव

नायगाव येथील बसवेश्वर महाराज चौकात जगद्गुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण यांनी उपस्थित राहून बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना मान्यवरांनी महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांचा उजाळा दिला. बाराव्या शतकातील महान समाजसुधारक म्हणून त्यांनी समता, बंधुता आणि श्रमाची प्रतिष्ठा यांचा संदेश दिला. बालविवाहासारख्या सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी आवाज उठवला तसेच अनुभव मंटप या माध्यमातून लोकशाही विचारांची पायाभरणी केली, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास नगरपंचायत प्रमुख विजय पाटील चव्हाण, माजी शिक्षण सभापती संजय आप्पा बेळगे, पंकज पाटील , सुधाकर शिंदे , माणिक चव्हाण , संजय चव्हाण ,विश्वनाथ बोमनाळे , शिवराज नागठाणे , बालाजी धोते , अजीत लंगडापूरे , मुन्ना मंगरोळे , दिलीप नागठाणे ,काशीनाथ बोमनाळे ,भास्कर चव्हाण , कैलास मठपती , शिवा स्वामी , अमोल मंगरूळे , राजू बेळगे ,केशव धोते , सचिन बल्लुरे , बालाजी नागठाणे जेष्ठ पत्रकार यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!