ताज्या बातम्यानांदेडनायगाव

दिव्यांग अल्पवयीनमुलीवर अत्याचार; नायगाव तालुक्यातील नराधमाला २० वर्षे सश्रम कारावास.

बिलोली न्यायालयाचानिर्णय; समाजमनात समाधानाची लाट.

नायगाव | बाळासाहेब पांडे

दिव्यांग अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला बिलोली येथील न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला आहे. जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वि. ब. बोहरा यांनी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व २७ हजार रुपये दंड ठोठावत कठोर संदेश दिला.

९ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथे घडलेल्या या संतापजनक घटनेत, पीडित मुलगी घरात एकटी असताना आरोपी योगेश भीमराव कोंडेवाड (वय ३२) याने मागच्या दरवाजातून प्रवेश करत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला होता. या अमानुष कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली होती.

पीडितेने उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून कुंटूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानातील कलम ३७६ (२) (ल), ४५२ तसेच पोक्सो कायदा व अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले.

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल एन. बहात्तरे यांनी अत्यंत बारकाईने करत ठोस तांत्रिक व वैद्यकीय पुरावे गोळा केले. न्यायालयात सरकार पक्षाने ८ साक्षीदार सादर केले. यामध्ये पीडितेची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल निर्णायक ठरले.

सरकार पक्षाचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. संदीप कुंडलवाडीकर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपीचा गुन्हा सिद्ध केला. त्यांना अॅड. जयेश अग्रवाल, अॅड. योगेश पुंड, पैरवी कर्मचारी पी.आय. इजूलकंटे, पो.हे.कॉ. ४११ आणि लिपीक सय्यद गौस यांचे सहकार्य लाभले.

२२ एप्रिल २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास आणखी ३ वर्षे सश्रम कारावास भोगावा लागणार आहे.

या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईच हाच एकमेव प्रतिबंधक उपाय असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!